Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

Latest Rain Update : मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत.

Team Agrowon

Pune Weather Update : मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज (ता. १८) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, सागर, दाल्टोनगंज जमशेदपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

राज्यात ढगाळ हवामान झाले असून, रविवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार, तर कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली.

आज (ता. १८) उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट), देण्यात आला आहे. उर्वरित कोकणासह नंदुरबार, धुळे नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्र निवळतेय

ठळक कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून, आग्नेय राजस्थान आणि पश्‍चिम मध्य प्रदेश परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. ही प्रणाली पुढील दोन दिवसांत नैॡत्य राजस्थानकडे सरकण्याची शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर.

तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT