Monsoon Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार सरींची शक्यता

Weather Update : उर्वरित राज्यात उघडीप राहण्याचा अंदाज

Team Agrowon

Weather News : पुणे : राज्यात पाऊस ओसरल्यानंतर ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. तसेच उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. ८) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा इशारा आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
झारखंड आणि उत्तर ओडिशामध्ये समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, या भागात आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या गंगानगरपासून पिलानी, आग्रा, चुर्क, रांची, दिधा ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर कर्नाटकपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

बुधवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथ्यावर पाऊस ओसरला होता. उर्वरित राज्यात पावसाने उघडीप दिल्याने ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. घाटमाथ्यावरील कोयना येथे उच्चांकी ९० मिलिमीटर, दावडी येथे ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  

आज (ता. ८) कोकणातील रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्याचा घाटमाथा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर येथे तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा ‘येलो अलर्ट’ आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
अमरावती, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT