Rain Forecast Agrowon
हवामान

Konkan Rain Forecast : कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Konkan Rain Update : कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकून जाताच राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे.

Team Agrowon

Pune Weather Update : कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकून जाताच राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. कोकण, घाटमाथा, आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १९) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, अजमेर, शिवपूरी, सिधी, डाल्टनगंज, दिघा ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. आग्नेय राजस्थान परिसरात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे गुजरात राज्यात ढगाळ हवामानासह पाऊस सुरू आहे.

राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. आज (ता. १९) उत्तर कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या संभाव्य कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत

आग्नेय राजस्थान आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. या भागात समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दरम्यान पूर्व-मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे वायव्य बंगालच्या उपसागरात उद्यापर्यंत (ता. २०) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT