Monsoon Agrowon
हवामान

Monsoon 2025: खूशखबर; माॅन्सून चांगला बरसणार; महाराष्ट्रातही चांगला पाऊस

IMD Forecast: २०२५ चा माॅन्सून हंगाम देशासाठी आशादायक ठरणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा १०५ टक्के अधिक पावसाची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News: २०२५ च्या माॅन्सून हंगामात सरासरीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. माॅन्सून काळात प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी इतके म्हणजेच तटस्थ एल निनो स्थिती राहण्याचा अंदाज आहे. तसेच तटस्थ आयओडी असेल.  उत्तर गोलार्धात युरेशियामध्ये हीम आच्छादनाचे प्रमाण सरासरी पेक्षा कमी आहे. ही परिस्थिती देशातील माॅन्सूनसाठी पोषक आहे. त्यामुळे माॅन्सून हंगामातील सरासरीपेक्षा १०५ टक्के अधिक पावसाचा अंदाज आहे. माॅन्सून काळात देशात सरासरी ८७ मिलिमीटर पाऊस पडत असतो. 

भारतीय हवामान विभागाने आज (ता.१५) देशातील माॅन्सून हंगामातील म्हणजेच जून ते सप्टेंबर २०२५ या काळातील पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला.  प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी इतके म्हणजेच तस्थ आहे. म्हणजे एल निनोही नाही आणि ला निनाही नाही.

प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल तर एल निनो परिस्थिती असते. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा कमी असेल तर ला निना. ला निना स्थिती भारताच्या माॅन्सूनसाठी पोषक मानली जाते. तर एल निनो स्थिती ही भारताच्या माॅन्सूनसाठी चांगली नसते. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरीसरीएतके असेल तर तटस्थ मानली जाते. या परिस्थितीत 

डिसेंबर ते मार्च या तीन महिन्यांमध्ये उत्तर गोलार्धात युरेशियामध्ये हीम आच्छादनाचे प्रमाण सरासरी पेक्षा कमी आहे. येथील हीम आच्छादनाच्या प्रमाणाशी विपरित संबंध आहे. युरेशियामध्ये हीम आच्छादनाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल तर माॅन्सूनसाठी चांगले असते. हीम आच्छादनाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल तर चांगले नसते. तसेच हीमालयासह आशियातील हीम आच्छादन कमी आहे. ही परिस्थिती माॅन्सूसाठी पोषक आहे. त्यामुळे माॅन्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price: देशात कापसाचे दर नरमले

Maharashtra GSDP: राज्याचे स्थूल उत्पन्न होणार वर्षातून दोन वेळा प्रकाशित

Crop Compensation Issue: सुधारित पीकविमा योजनेमुळे भरपाईला ठेंगा

Fertilizer Shortage: देशातील खत टंचाईमुळे आयातीच्या हालचालींना जोर

Maharashtra Monsoon Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT