Weather News Agrowon
हवामान

Weather News : तापमानात वाढ शक्य

Cold Weather : राज्यात गारठा काहीसा कमी होण्याचा अंदाज

Team Agrowon

High Temprature : पुणे : राज्यात किमान तापमानात वाढ होत असल्याने गारठा काहीसा कमी होत आहे. धुळे वगळता राज्याच्या किमान तापमानाचा पारा १० अंशाच्या पार गेला आहे.

आज (ता. २८) राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात गारठा काहीसा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. बुधवारी (ता. २७) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यात तापमानाचा पारा १० अंशांच्या वर गेला आहे.

आज (ता. २८) राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३३.५ (१३.२), धुळे ३३.० (९.३), जळगाव ३०.२ (१२.६), कोल्हापूर ३१.१ (१७.०), महाबळेश्वर २८.८ (१६.१), नाशिक ३२.९ (१४.२), निफाड ३१.४ (१२.५), सांगली ३१.० (१५.१), सातारा ३३.१ (१३.५), सोलापूर ३३.२(१६.१), सांताक्रूझ ३५.७ (१९.८), डहाणू ३३.० (१९.०),

रत्नागिरी ३५.६ (१९.८), छत्रपती संभाजीनगर ३१.२ (१३.६), नांदेड ३०.२ (१४.६), परभणी ३१.० (१४.५), अकोला ३२.५ (१४.३), अमरावती ३०.२ (१५.०), बुलडाणा ३१.० (१४.८), ब्रह्मपुरी ३३.० (१४.४), चंद्रपूर २९.२(१२.४), गडचिरोली २९.६ (१२.६), गोंदिया २८.६ (१२.४), नागपूर २९.९(१४.६), वर्धा ३०.०(१४.६), वाशीम ३०.८ (१३.४), यवतमाळ ३२.० (१३.२).

उत्तर भारतातील थंडीत चढ-उतार
उत्तर भारतात थंडी कमी - अधिक होत असून, बुधवारी (ता. २७) पंजाब मधील लुधियाना येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये अनेक भागात किमान तापमान ७ ते १० अंशांच्या दरम्यान होते. उत्तरेकडून महाराष्ट्राकडे येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह काहीसे कमी झाल्याने राज्यात गारठा कमी होऊ लागला आहे.

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :
धुळे ९.३, परभणी (कृषी) १०.३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

HDPS Cotton Fertilizer: कपाशीच्या सघन लागवडीत खत व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण नियोजन

Agriculture Infrastructure Fund: कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेसाठी २० जुलैपर्यंत मोहीम

Kharif Sowing: बुलडाणा जिल्ह्यात पेरण्यांना वेग

Advanced Farming: प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे यशस्वी शेतकऱ्यांच्या मार्गाचे अनुकरण करा : रहेमान

Rain Update: राज्यात ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढणार

SCROLL FOR NEXT