Maharashtra Weather: राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. महाराष्ट्राच्या काही भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान तयार होत आहे. आज (ता. २) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप राहून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..उत्तर म्यानमार आणि आग्नेय बांगलादेशमध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) राजधानी दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरियानाच्या बहुतांश, तर गुजरात, उत्तर प्रदेशच्या काही भागांतून परतले आहे. गुरुवारी (ता.१) मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती. उद्यापर्यंत (ता.३) देशाच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे. दक्षिण कर्नाटकपासून मन्नारच्या आखातापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे..Rain Update: महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता.पावसाने उघडीप देताच, राज्यात दुपारच्या वेळी उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. गुरुवारी (ता.१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली..Maharashtra Weather Forecast: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज.मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असतानाच, आज (ता. २) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामान, ऊन सावल्यांच्या खेळात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..विजांसह पावसाची शक्यतारायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये)मालेगाव ३७.४, अमरावती ३६.८, अकोला ३६.३, वाशीम ३६, वर्धा ३५.५, जळगाव ३५.३, चंद्रपूर ३५.४..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.