Rain  Agrowon
हवामान

Crop Damage : पुण्यात पावसाने पिकांना दणका

Team Agrowon

Pune News : परतीचा पावसाला सुरूवात झाल्यानंतर राज्यासह पुणे जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस कोसळत आहे. बुधवारी (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यंत खेड तालुक्यातील आळंदी येथे सर्वाधिक ८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात चांगलाच पाऊस होतो आहे. दिवसभर ऊन पडत असल्याने उकाड्यात मोठी वाढ होत आहे. मंगळवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाने सुरूवात केली. बुधवारी देखील सकाळपासून ऊन पडले होते. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा वाढत आहे.

परंतु दुपारनंतर वातावरणात बदल होत आहे. काही वेळा वेगाने पावसाच्या सरी कोसळत आहे. अचानक झालेल्या पावसामुळे पावसामुळे वेल्हे तालुक्यातील काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. पावसामुळे तालुक्यातील शेतकरी शेतामधील उरलेली कामे लवकर करण्यावर भर देत आहे.

आळंदीमध्ये मेघगर्जनेसह तब्बल तीन तास झालेल्या पावसामुळे रस्त्यांना पूर आला होता. तर पिंपळगाव येथे ३६ मिलिमीटर पाऊस पडला असून वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, कन्हेरसर, कडुस येथे तुरळक सरी पडल्या. हवेलीतील भोसरी येथे ४९ मिलिमीटर, तर कळस ४० मिलिमीटर पाऊस पडला.

मुळशीतील थेरगाव, माले, मुठे येथे शिडकावा झाला. भोरमधील भोलावडे येथे ५३ मिलिमीटर, तर नसरापूर ४९, संगमनेर ४८, किकवी २१, भोर २४ मिलिमीटर, तर वेळू, आंबवडे, निगुडघर, मावळातील वडगाव मावळ, तळेगाव, काले, कार्ला, खडकाळा, लोणावळा, शिवणे येथे तुरळक सरी कोसळल्या. वेल्ह्यातील आंबवणे येथे ४९ मिलिमीटर, तर पानशेत, विंझर येथे हलका पाऊस झाला.

जुन्नरमधील वडगाव आनंद येथे ४४ मिलिमीटर, तर जुन्नर ३२, नारायणगाव २४, ओतूर २५ मिलिमीटर, निमगाव सावा, बेल्हा, राजूर, डिंगोरे, आपटाळे येथे हलका, आंबेगावमधील आंबेगाव येथे ४२ मिलिमीटर, कळंब २८, मंचर २० मिलिमीटर, शिरूरमधील न्हावरा येथे ५८ मिलिमीटर, वडगाव ३४ मिलिमीटर, तर टाकळी, मलठण, तळेगाव, रांजणगाव, कोरेगाव, पाबळ, शिरूर, बारामतीतील माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव, उंडवडी येथे हलका पाऊस झाला. इंदापूरातील निमगाव येथे २१ मिलिमीटर, तर भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, अंथुर्णी, सणसर येथे हलका, दौंडमधील पारगाव येथे ५८ मिलिमीटर पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Moong Rate : हिंगोली बाजार समितीत मूग १०,००० ते १३,०५० रुपये दर

Rain Update : बावड्यात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद

Agricultural Issue Protest : पीकविमा, मदतीच्या मुद्यावर तुपकर यांचा ‘ठिय्या’

Clean Village Competition : काळवाडीस स्वच्छतेचा राज्यस्तरीय पुरस्कार

Onion Export Policy : स्थिर कांदा निर्यात धोरण हवे; २० टक्के निर्यात शुल्क माफ करा

SCROLL FOR NEXT