Pune News : राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. तरीही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. तर घाटमाथ्यावर बऱ्यापैकी पाऊस कोसळत असून, रविवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर ६६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक ठिकाणी शेतीकामांना सुरुवात झाली असून, काही ठिकाणी पिकांची काढणी व मळणीची कामे सुरू झाली आहेत.
कोकणात कमीअधिक पाऊस पडत आहे. ठाणे जिल्ह्यातील नयाहडी येथे ५९ मिलिमीटर, रायगडमधील बिरवडी येथे ४४ मिलिमीटर, तर कर्जत ४२, खोपोली ३३ मिलिमीटर, सिंधुदुर्गमधील भेडशी येथे ३० मिलिमीटर, तर वैभववाडी, येडगाव, भुईबावडा, तळकट येथे हलका, तर पालघरमधील मोखडा, खोडला, तलवड येथे तुरळक सरी बरसल्या. पाऊस नसल्याने भात पिकांची वाढ चांगली असून ओढ्या, नाल्यांतील पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे.
खानदेशात पाऊस नसला तरी काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. यामध्ये नंदुरबारमधील नवापूर, विसरवाडी, खांडबारा, सारंगखेडा, वडाळी, जळगावमधील बहाळ, मेहुणबारे, हातले, तळेगाव, खडकी तुरळक सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रातील पुण्यातील वेल्हा येथे ३६ मिलिमीटर, तर सोलापूरमधील अक्कलकोट, जेऊर, करजगी, दुधनी, मैंदर्गी, चपळगाव तुरळक सरी, सातारामधील लामज येथे २८ मिलिमीटर पाऊस झाला. कोल्हापुरातील साळवण येथे ३२ मिलिमीटर, तर राधानगरी येथे ३१ मिलिमीटर तर, भेडसगाव, करंजफेन, मलकापूर, आंबा, कसबा, आवळी, कसबा, गगनबावडा, गारगोटी, कडेगाव, कराडवाडी, चंदगड, नारंगवाडी, माणगाव, हेरे येथे हलका पाऊस झाला.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर मधील देवगाव रंगारी येथे २८ मिलिमीटर, तर वेरूळ, बाजार, बनोटी येथे तुरळक जालन्यातील जामखेड, गोंधी, वाडीगोद्री, सुखापुरी, परतूर, वाटूर, आष्टी, शृष्टी येथे हलका झाला. बीडमधील तळवडा येथे ३९ मिलिमीटर, तर गेवराई, जातेगाव, पाचेगाव, ढोणदराई, उमापूर, सिरसदेवी, रेवकी, कित्तीडगाव, तालखेड, केज, हनुमंत पिंपरी, होळ, विडा, धारूर, वाडवणी, कावडगाव येथे हलका, लातूरमधील निटूर, हिस्माबाद येथे ३६ मिलिमीटर, तर आंबुलगा येथे २८ मिलिमीटर, तर लातूर, बाभळगाव, हारंगूळ, कासारखेडा, मातोळा, बेलकुंड, किणी, पानचिंचोली, जळकोट येथे तुरळक, धाराशिवमधील तुळजापूर, इतकल, जळकोट, नळदुर्ग येथे शिडकावा. नांदेडमध्ये अनेक ठिकाणी मध्य सरी कोसळल्या असून सिंदगी येथे ४६ मिलिमीटर, तर जाहूर ४५, खापूर ४४, किनवट ३७, कळंबर ३५, हिमायतनगर, सरसम, नारंगळ ३४, लोहा ३३ मिलिमीटर पाऊस पडला.
विदर्भात यवतमाळमधील गुंज येथे ५२ मिलिमीटर, तर हिवरा ५१, फुलसावंगी ५०, महागाव, मोरथ ४०, पुसद, बोरी २२, बोराळा २३ मिलिमीटर, बुलडाण्यातील जळगाव, जामोद येथे ३७ मिलिमीटर, तर आसलगाव ३३, शेगाव ३० मिलिमीटर, अमरावतीतील वरखेड येथे ५० मिलिमीटर, तर चिखलदरा, टेंभूरसोंडा ३७, शिरखेड ३४, कुऱ्हा २६, ब्राह्मणवाडा २८ मिलिमीटर, नागपूरमधील पाचखेडी येथे ५० मिलिमीटर, तर कान्हान ३७ मिलिमीटर, तर नागपूर, सीताबर्डी, पार्डी, कामठी, वडोदा, कारडी, दिघोरी, आमडी, पारशिवणी, नावेगाव, सावनेर, केळवड, खापा, पाटनसावंगी, बडेगाव, कुही, मंधाळ, वेलतूर, राजोली, तितूर हलका, भंडाऱ्यांतील साकोली, आकोडी येथे तुरळक, गोंदियातील परसवाडा येथे ६० मिलिमीटर, तर मोहाडी, तिल्ली येथे हलका, चंद्रपुरातील घुगस, पडोली, शिंदेवाही, मोहाली येथे शिडकावा झाला. गडचिरोलीतील भामरागड ६० मिलिमीटर, तर कमलापूर ३४, तरडगाव ३९ मिलिमीटर, तर सिरोंचा, पेंटीपका, असारळी, जिमलगट्टा, पेरमिली येथे तुरळक सरी पडल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.