Weather Agrowon
हवामान

Weekly Weather : थंडीच्या प्रमाणात हळूवार होईल वाढ

Maharashtra Weather : मंगळवार ते शनिवार (ता. १२ ते १६) या दरम्यान महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतके होताच, थंडीचे प्रमाण थोडे कमी होईल.

 डॉ. रामचंद्र साबळे 

डॉ. रामचंद्र साबळे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर आज आणि उद्या (ता. १०, ११) १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा अधिक दाब राहील. त्यामुळे पहाटे व सकाळच्या वेळी थंडीचे प्रमाण वाढेल. मंगळवार ते शनिवार (ता. १२ ते १६) या दरम्यान महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतके होताच, थंडीचे प्रमाण थोडे कमी होईल. राजस्थान भागावरील हवेचे दाब १०१४ हेप्टापास्कल होताच पुन्हा थंडीचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल. सकाळी थंडी व दुपारी उष्ण हवामान जाणवेल. हवेचे दाब हळूहळू वाढत जातील, तसे किमान तापमानात वेगाने घसरण होण्यास सुरुवात होईल.

सध्या मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमानात घसरण होत आहे. बहुतांश भागात किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. कमाल तापमानातही हळूवारपणे घसरण होण्यास सुरुवात झाली असून, ते ३० ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. काही भागात अल्पसे ढगाळ हवामान एखाद्या दिवशी राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट झाली असून, ती ३० ते ३५ टक्के इतकी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी हवामान कोरडे राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १६ कि.मी. राहील. मात्र इतर सर्व जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. सध्या वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे थंडीच्या प्रमाणात हळूवारपणे वाढ होत आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६० टक्के राहण्यामुळे हवामान आल्हाददायक राहील.

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात पेरूजवळ १७ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २३ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव सध्या राहणार नाही. मात्र हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय भागात पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस, तर अरबी समुद्राचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस राहील.

कोकण

या आठवड्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. मात्र रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ६२ ते ६९ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ५३ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत ३१ ते ४० टक्के इतकी कमी राहील. हवामान कोरडे राहील.

उत्तर महाराष्ट्र

कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ कि.मी. राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील.

मराठवाडा

धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग धाराशिव जिल्ह्यात १६ कि.मी., लातूर व बीड जिल्ह्यांत ताशी वेग १२ ते १३ कि.मी. राहील. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ताशी ११ कि.मी., तर जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी १० कि.मी. आणि नांदेड जिल्ह्यात ताशी ९ कि.मी. वेगाने वारे वाहतील. कमाल तापमान परभणी जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर धाराशीव, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ६३ ते ७० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ३८ टक्के राहील.

पश्चिम विदर्भ

वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० कि.मी. राहील. कमाल तापमान बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३५ टक्के राहील.

मध्य विदर्भ

यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान वर्धा जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ६५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३६ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील.

पूर्व विदर्भ

सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. राहील. कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ८० टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत ७० ते ७४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३३ ते ३८ टक्के राहील.

पश्चिम महाराष्ट्र

वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १६ कि.मी. राहील. नगर जिल्ह्यात वारे ताशी १३ कि.मी., तर सातारा व पुणे जिल्ह्यांत ताशी १० कि.मी. व कोल्हापूर जिल्ह्यात ताशी ९ कि.मी. वेगाने वाहतील. कमाल तापमान सोलापूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, पुणे, अहिल्यानगर व कोल्हापूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर सांगली, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३५ टक्के राहील.

कृषी सल्ला

तयार भात पिकाची कापणी वैभव विळ्याने जमिनीलगत करावी. कापणी केलेले भात पीक झोडणी करून धान्याला उन्हात वाळवून साठवणूक करावी.

कापूस वेचणीची कामे सकाळच्या वेळी करावीत.

पूर्वहंगामी उसाची लागवड पूर्ण करावी.

बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी.

आंबा व काजू पिकामध्ये आलेल्या नवीन पालवीच्या संरक्षणासाठी योग्य उपाययोजनांची अंमलबजावणी करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season 2024 : दामाजी, विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचा वाहतूक खर्च कमी

Latur Voting Percentage : वाढलेल्या मताच्या टक्क्याचा कोणाला बसणार?

Nashik Assembly Voting : नाशिक जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान

Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

SCROLL FOR NEXT