Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट शक्य

Weather News : राज्यात आकाश निरभ्र होत असतानाच उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात काहीशी घट होत आहे.

Team Agrowon

Cold Season : पुणे : राज्यात आकाश निरभ्र होत असतानाच उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात काहीशी घट होत आहे. आज (ता. २१) मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट होण्याचा अंदाज कायम आहे. उर्वरित राज्यात तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पार गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. मंगळवारी (ता. २०) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्याने निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ९.६ अंशांची नोंद झाली आहे. आज (ता. २१) उन्हाचा चटका कायम राहणार असला, तरी मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३५.३ (१३), धुळे ३५.५ (१०.५), जळगाव ३४.२ (१४.९), कोल्हापूर ३४.४ (१९.२), महाबळेश्‍वर २९.६ (१६.४), मालेगाव ३६.४ (१६.६), नाशिक ३३.१ (१५.६), निफाड ३२.५ (९.६), सांगली ३५.९ (१८.९), सातारा ३४.७ (१५), सोलापूर ३६.८ (२०), सांताक्रूझ ३३ (२०), डहाणू ३२.८ (१८), रत्नागिरी ३२.१ (१८.१), छत्रपती संभाजीनगर ३३.८ (१६.४), नांदेड ३५.८ (१९.६), परभणी ३६ (१७.६), अकोला ३६.३ (१८), अमरावती ३४.८ (१८.५), बुलडाणा ३४ (१८.८), चंद्रपूर ३४.८ (१८.२), गडचिरोली ३३.४ (१७.४), गोंदिया ३३.२ (१८.४), नागपूर ३४.१ (१८.८), वर्धा ३६ (१९.५), वाशीम ३३.८ (१५.८), यवतमाळ ३५.७ (१७).

उत्तर भारतात गारपिटीचा इशारा
उत्तर भारतात थंडी कमी-अधिक होत असून, राजस्थानच्या चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उत्तर भारतात १७० नॉट्स वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर भारतात विजांसह पाऊस, गारपिटीचा इशारा कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT