Maharashtra Monsoon Update agrowon
हवामान

Monsoon Update Maharashtra : ‘मॉन्सून’मध्ये राज्यात ९७ टक्के पाऊस

IMD Monsoon Update : यंदा राज्यात तब्बल ९६५.७ मिलिमीटर (९७ टक्के) म्हणजेच सरासरीच्या तुलनेत उणे तीन टक्के पावसाची नोंद झाली.

अमोल कुटे

Pune News : यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) पावसाने मोठे खंड देत कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. मॉन्सूनचे उशिरा आगमन, जून आणि ऑगस्ट महिन्यांत पावसाची दडी असतानाही, जुलै आणि सप्टेंबरमधील समाधानकारक पावसाने राज्यातील सरासरी गाठली आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात ९६५.७ मिलिमीटर, म्हणजेच ९७ टक्के पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे.

१ जून ते ३० सप्टेंबर हा मॉन्सूनच्या पावसाचा हंगाम मानला जातो. या कालावधीत राज्यात दीर्घकालीन सरासरीनुसार ९९४.५ टक्के पाऊस पडते. यंदा राज्यात तब्बल ९६५.७ मिलिमीटर (९७ टक्के) म्हणजेच सरासरीच्या तुलनेत उणे तीन टक्के पावसाची नोंद झाली.

गतवर्षी राज्यात १२१९.७ मिलिमीटर म्हणजेच २३ टक्के अधिक पाऊस झाला होता. सलग तीन वर्षे चांगला पाऊस झाल्यानंतर यंदाच्या पावसात पडलेल्या मोठ्या खंडाने चिंता वाढविली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील सरासरी कशीबशी गाठली.

यंदा मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले. तळ कोकणात ११ जून रोजी दाखल झाल्यानंतर राज्यातील पुढील वाटचाल लांबली. २३ जून रोजी पुन्हा वाटचाल सुरू केल्यानंतर वेगाने चाल करत मॉन्सूनने दोनच दिवसांत (ता. २५ जून) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला.

त्यानंतर राज्यात पावसाचे वितरण असमान असल्याचे दिसून आले. सह्याद्रीच्या कुशीतील धरणे भरली असली, तरी यंदा राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून ७४ टक्के पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात ८८ टक्के, उजनीत ३७ टक्के तर जायकवाडी धरणात ४५ टक्के चल पाणीसाठा आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कमी पाऊस

विभागनिहाय पडलेल्या पावसाची स्थिती पाहता सप्टेंबर अखेरपर्यंत कोकण आणि विदर्भात सरासरी पाऊस झाला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने कशीबशी सरासरी गाठली आहे. चांगला पाऊस झाल्याने कोकण विभागात ११ टक्के अधिक पाऊस पडला आहे.

विदर्भात उणे २ टक्के पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागांत मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत उणे १२ टक्के, तर मराठवाड्यात उणे ११ टक्के पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) राज्यात विभागनिहाय पडलेला पाऊस

विभाग---सरासरी---पडलेला---टक्केवारी

कोकण-गोवा---२८७०.८---३१७७.६---अधिक ११

मध्य महाराष्ट्र---७४७.४---६५५.७---उणे १२

मराठवाडा---६४२.८---५७३.२---उणे ११

विदर्भ---९३७.३---९२१.२---उणे २

नऊ जिल्ह्यांत मोठी तूट; चार जिल्ह्यांत अधिक पाऊस

राज्यातील जिल्हानिहाय पडलेल्या पावसाची स्थिती विचारात घेता यंदा मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, हिंगोली आणि विदर्भातील अकोला, अमरावती या ९ जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट आहे.

सांगली जिल्ह्यात सर्वाधिक ४४ टक्के तूट दिसून आली. तर पालघर, ठाणे, मुंबई उपनगर आणि नांदेड जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मुंबई उपनगरात सर्वाधिक (२८ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली. राज्यातील १२ जिल्ह्यांत पावसाने कशीबशी सरासरी गाठली आहे.

जिल्हानिहाय पावसाचे प्रमाण :

सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के अधिक) :

पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, नांदेड.

सरासरी इतका (उणे १९ ते १९ टक्के अधिक) :

मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

सरासरीपेक्षा कमी पाऊस (उणे २० ते उणे ५९ टक्के)

सातारा, सांगली, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, हिंगोली, अकोला, अमरावती.

राज्यात महिनानिहाय पाऊस (सौजन्य : हवामान विभाग)

महिना---सरासरी---पडलेला---तफावत (टक्क्यांत)

जून---२०९.८---११३.४---उणे ४६

जुलै---३२४.२---४९३.०---अधिक ५२

ऑगस्ट---२८०.२---११४.६---उणे ५९

सप्टेंबर---१८०.३---२४४.८---अधिक ३६

मॉन्सूनमधील (जून ते सप्टेंबर) जिल्हानिहाय पाऊस स्थिती

जिल्हा---सरासरी---पडलेला---तफावत (टक्क्यांत)

मुंबई शहर---२०९४.५---१९८३.०---उणे ५

पालघर---२२६२.७---२७४३.८---अधिक २१

रायगड---३१२७.४---३५२८.३---अधिक १३

रत्नागिरी---३१९४.४---३१४०.१---उणे २

सिंधुदुर्ग---२९५०.७---३११९.२---अधिक ६

मुंबई उपनगर---२३१८.८---२९७८.३---अधिक २८

ठाणे---२४३३.३---३०९९.१---अधिक २७

नगर---४५६.०---४१०.४---उणे १०

धुळे---५४३.९---४९६.१---उणे ९

जळगाव---६२५.२---६६१.६---अधिक ६

कोल्हापूर---१७११.४---१४२९.८---उणे १६

नंदूरबार---८४१.६---८१७.६---उणे १३

नाशिक---८९३.९---९२१.९---अधिक ३

पुणे---९४९.२---८९६.६---उणे ६

सांगली---४८६.१---२७२.७---उणे ४४

सातारा---८४४.६---५३५.६---उणे ३७

सोलापूर---४५८.१---३१९.३---उणे ३०

बीड---५५७.४---५७३.२---उणे ११

छ. संभाजीनगर---५६३.६---४९९.९---उणे २१

धाराशिव---५७९.६---४४२.३---उणे २४

हिंगोली---७५८.३---५८३.८---उणे २३

जालना---५९१.८---३९८.०---उणे ३३

लातूर---६६६.८---६११.३---उणे ८

नांदेड---७६२.६---९६४.३---अधिक २३

परभणी---७०४.९--५८५.२---उणे १७

अकोला---६९४.२---५३२.९----उणे २३

अमरावती---८२२.९---६०२.४---उणे २७

भंडारा---१०८५.१---११६०.६---अधिक ७

बुलडाणा---६४७.६---५९४.१---उणे ८

चंद्रपूर---१०७६.३---११६०.६---अधिक ७

गडचिरोली---१२८९.७---१३६२.८---अधिक ६

गोंदिया---१२१४.७---११०६.७---उणे ८

नागपूर---९३८.५---९८८---अधिक ५

वर्धा---८४०.८---८१२.८---उणे ३

वाशीम---७७२.३---६५३.३---उणे १५

यवतमाळ---८०८.०---९२४.३---अधिक १४

मॉन्सून हंगामात राज्यात पावसाने सरासरी गाठली आहे. ९ जिल्ह्यांत पावसात तूट दिसून आली आहे. सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या पावसाने राज्याच्या अनेक जिल्ह्यांतील सरासरी भरून काढली. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. ४ आणि ५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर महाराष्ट्रातून मॉन्सून परतण्याची चिन्हे आहेत.
- डॉ. अनुपम कश्यपी, प्रमुख, हवामान अंदाज विभाग, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT