Rain Update Agrowon
हवामान

Monsoon Rain : विदर्भातील ३ दिवस पावसाचा अंदाज; राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस उघडीप देण्याची शक्यता

Rain Update : हवामान विभागाने पुढील ४ दिवस काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या अनेक भागात आज पावसाची उघडीप पाहायला मिळाली. तर काही भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरी होत्या. हवामान विभागाने पुढील ४ दिवस काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 

हवामान विभागाने उद्या विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली तेसच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

गुरुवारी विदर्भावातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तसेच कोकण, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नगर, नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यातही काही भागात मध्यम सरी पडतील, असा अंदाज आहे. 

शुक्रवारी विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. शनिवारी राज्याच्या बहुतांंशी भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

Soybean Seed Distribution: अनुदानावरील सोयाबीन बियाण्याचे वितरण सुरू

Jal Jeevan Mission: जलजीवन मिशन योजनेची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका : रवींद्र खेबुडकर

Sangli Pre Monsoon Rain: सांगली जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी

Rice Crop Management: चारसूत्री तंत्राने भात पिकाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT