Fruit farming guide agrowon
Video

Fruit orchard preparation: फळबाग लागवड करताना कोणती जमीन निवडावी?

फळबाग लागवड करताना जमिनीची प्रकार, जमिनीची खोली आणि मुरूम किती खोलीवर आहे? जमिनीचा निचरा कसा आहे? याचीच माहिती सोलापूर येथील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र मृद्‍ शास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ ताकटे यांनी दिली आहे.

Team Agrowon

फळबाग लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची असते. फळबागेसाठी कमीत कमी एक मीटर खोलीनंतर मुरमाचा थर असणारी जमीन निवडावी. भरपूर सेंद्रिय कर्ब, भुसभुशीत, मध्यम पोताच्या जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा. मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असावे. जमिनीचा उतार २ ते ३ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. ज्या ठिकाणी फळबाग लावायची आहे, त्या ठिकाणच्या मातीचे परीक्षण करावे. जास्त खोल, क्षारयुक्त जमिनी, चोपण जमिनी यातून पाण्याचा योग्य निचरा होत नाही. अशा जमिनीत लागवड केल्यानंतर सुरुवातीला फळझाडे वाढल्यासारखी दिसली, तरी पुढे वाढीचा वेग मंदावतो, उत्पादन मिळत नाही. ज्या जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा जमिनीत फळबागेची वाढ होत नाही. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: मुदखेड, धर्माबाद, किनवट, अर्धापूर, बिलोली तालुक्यांत पावसाची हजेरी

Farm Loan Waiver: हिंगोली जिल्हा बॅंकेअंतर्गत ९०८ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती

Additional Tehsil Office: उत्तर सोलापुरातील वडाळ्यात ‘अपर तहसील कार्यालय’ मंजूर

Public Protest: लाल बावट्याचा पुन्हा एल्गार

Ashadhi Wari 2026: सोलापूर जिल्हा परिषदेकडून आषाढी वारीतील विकासकामांच्या निविदांना मंजुरी

SCROLL FOR NEXT