green chilli price agrowon
Video

Wheat Rate: गव्हाचे दर स्थिर; तसेच काय आहेत शेवगा, बटाटा, हिरवी मिरची आणि पेरूचे आजचे दर

market rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण शेवगा, बटाटा, गहू, हिरवी मिरची आणि पेरू बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

drumstick price: बाजारातील शेवग्याची आवक कमीच आहे. त्यामुळे शेवग्याचे भावही तेजीतच आहेत. शेवगा आजही ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला गेला. देशात यंदा बटाटा उत्पादन चांगले झाले. देशातील महत्वाच्या बटाटा उत्पादक उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे बाजारातील बटाटा आवकही चांगली आहे. बटाट्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशातील बाजारात नव्या मालाची आवक आणि सरकारने लादलेले स्टाॅक लिमिट यामुळे गव्हाचे भाव स्थिरावले आहेत. गव्हाचे भाव मागील महिनाभरात जवळपास २०० रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या गहू २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे. तर दुसरीकडे मागणी आहे. त्यामुळे हिरवी मिरची ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयाने विकली जात आहे. बाजारातील पेरुची आवक मागील ३ आठवड्यांपासून मर्यादीत दिसत आहे. पावसामुळे पेरुला उठावही कमी आहे. सध्या पेरू ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: कोकणात उकाडा वाढला; विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा चटका वाढला

Tanta Mukti Committee: गावागावांतील ‘तंटामुक्ती’ कागदावरच

Biometric Attendance: ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक अनिवार्य

Wheat in Summer: उन्हामुळे गव्हाचा दाणा बारीक? तातडीने करायच्या ३ उपाययोजना

Veterinary Doctors Protest: पशुवैद्यक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली; १० मार्चला सामूहिक राजीनाम्याचा इशारा

SCROLL FOR NEXT