jamun fruit price agrowon
Video

Wheat Price: गव्हाचे दर स्थिर; तसेच काय आहेत कोबी, जांभूळ, गाजर आणि ज्वारीचे आजचे बाजारभाव

Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कोबी, गहू, जांभूळ, गाजर आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

cabbage rate: कोबीचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून टिकून आहेत. बाजारातील कोबीची आवक सरासरीच आहे. कोबीला बाजारात सध्या सरासरी ८०० ते १ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत. देशातील गव्हाचे उत्पादन वाढल्यानंतरही दर तेजीत होते. गव्हाचे भाव आजही सरासरी २ हजार ५०० ते २ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सरकारची खरेदीही ३०० लाख टनांच्या दरम्यान झाली. गाजराची बाजारातील आवक मागील काही आठवड्यांपासून कमी झाली आहे. सध्या बाजारात गाजर प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. जांभळाचा हंगाम आता सुरु झाला. सध्या बाजारातील आवक कमी आहे. जांभळाला सध्या गुणवत्तेप्रमाणे ६ हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीचे उत्पादन चांगले झाल्याने दरावर दबाव असल्याचे दिसत आहे. रब्बीच्या ज्वारीची बाजारात आवक सुरु झाल्यानंतर दरावर दबाव वाढला होता. दरपातळी २०० ते ३०० रुपयांनी कमी झाली होती. ज्वारीच्या दरावरील दबाव आजही कायम आहे. ज्वारीला सरासरी प्रतिक्विंटल २६०० ते २८०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jaggery Export: युद्धामुळे गूळ निर्यात थांबली

Leopard Protection: बिबट्याला शेड्यूल-२ मध्ये टाकण्याचा निर्णय

Forest Food: कोल्हापुरात उद्यापासून कंदमुळांचे दोनदिवसीय प्रदर्शन

Summer Vegetable: उन्हाळ्यासाठी दुधीभोपळ्याची लागवड कशी करावी?

Tractor Industry: राज्य बनतेय उच्चशक्तीच्या निर्यातक्षम ट्रॅक्टरचे उत्पादन केंद्र

SCROLL FOR NEXT