Animal Care Agrowon
Video

Animal Care: जनावरांतील न्यूमोनियावर उपाय काय आहेत?

Pneumonia Symptoms: थंडी व ताप अशा लक्षणांसह जनावरांच्या फुफ्फुसात पाणी साठून फुफ्फुसांना सूज येते. त्यामुळे त्यांच्या श्‍वासोच्छ्‌वासाचा वेग वाढतो.

Team Agrowon

Animal Pneumonia: न्यूमोनियावर उपचार करताना जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरड्या आणि उंच ठिकाणी असावा. गोठ्यात जर पावसाच पाणी येत असेल तर अशा गोठ्याची दुरुस्ती करुन घ्यावी.  योग्य ते उपाय करुन गोठ्यातील तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा. लक्षात ठेवा गोठ्याची नियमित स्वच्छता हा एक न्यूमोनिया टाळण्याचा मुख्य उपाय आहे. आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवाव. न्यूमोनिया आजारावर दिली जाणारी प्रतिजैविके फक्त वैद्यकीय सल्ल्यानेच द्यावीत. कोमट पाण्यात पोटॅशिअम मिसळून त्याने वेळोवेळी जनावरांचे नाक स्वच्छ करावं. जनावरांना थंडी वाजू नये म्हणून कृत्रिम ऊब उपलब्ध करून देण्यासाठी स्वच्छ गोणपाटाचा वापर करावा. याशिवाय शारीरिक झीज भरून काढण्यासाठी जनावरांना पौष्टिक आहार द्यावा. अशाप्रकारे गोठ्यात स्वच्छता ठेऊन जनावरांना चांगला आहार देऊन न्यूमोनियाचा प्रादुर्भाव टाळता येतो. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India methane emissions : भारतातील कृषी व पशुधन क्षेत्रातील मिथेन उत्सर्जनाकडे संयुक्त राष्ट्रांनी लक्ष वेधले; अहवालात कोणते मुद्दे?

Kolhapur Politics: मुश्रीफ- घाटगे युतीनंतर कागलचं राजकारण ढवळून निघालं, उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवलं, नेमकं चाललंय काय?

Rabi Season: रब्बीसाठी कृषी विद्यापीठात उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध

Rabi Sowing: अकोला जिल्ह्यात रब्बी पेरणीला वेग

Modern Farming: ही प्रगतशील शेती आजोबांची ‘देन’

SCROLL FOR NEXT