New Delhi: अमेरिका आणि भारतातील व्यापार करार मका आणि सोयाबीनवरून रखडल्याची चर्चा आहे. त्यातच आता अमेरिकेतून भारताच्या कडधान्य आयात धोरणाला विरोध होत आहे. भारताने पिवळा वाटाणा आयातीवर ३० टक्के शुल्क लावले आहे. व्यापार कराराच्या चर्चेत हा मुद्दा घ्यावा अशी मागणी अमेरिकेच्या दोन सिनेटर्सनी (लोकप्रतिनिधी) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे केली आहे..भविष्यातील कोणत्याही करारात भारताच्या कडधान्य आयात शुल्कावर लक्ष ठेवावे, अशी मागणी अमेरिकच्या दोन सिनेटर्सनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे केली आहे. मोंटाना राज्यातील सिनेटर स्टीव्ह डेन्स आणि नॉर्थ डकोटा येथील केविन क्रॅमर यांनी १६ जानेवारी रोजी ट्रम्प यांना पत्र लिहिले. भारताने कडधान्यावरील आयात शुल्क वाढविल्याने अमेरितील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी या पत्रात केला आहे..India US Trade: हुलकावणी देणारा व्यापार करार.‘मसूर, हरभरा, सोयाबीन आणि वाटाणा हे भारतातील सर्वांत जास्त वापरल्या जाणाऱ्या कडधान्य पिकांपैकी आहेत; परंतु भारताने अमेरिकवर मोठे शुल्क लादले आहे. भारताने १ नोव्हेंबर २०२५ पासून वाटाण्याच्या आयातीवर ३० टक्के आयात शुल्क लागू केले आहे,’ असे या पत्रात म्हटले आहे..भारताच्या या निर्णयाचा अमेरिकी शेतकऱ्यांना तोटा होत असल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. ‘आमची दोन्ही राज्ये वाटाण्यासह कडधान्य पिकांचे मोठे उत्पादक आहेत, तर भारत हा जगातील सर्वांत मोठा कडधान्यांचा ग्राहक असून जागतिक वापरात त्याचा सुमारे २७ टक्के वाटा आहे. परंतु भारताच्या आयात शुल्कामुळे अमेरिकेतील कडधान्य उत्पादकांना भारतात निर्यात करताना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे,’ असेही या पत्रात नमूद केले आहे..India US trade : डोनाल्ड ट्रम्प यांचे आरोप भारताने फेटाळले; कमी दरात तांदूळ निर्यात नाही, भारताचे स्पष्टीकरण.डेन्स आणि क्रॅमर यांनी या दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्य वाढवण्याकडे लक्ष वेधले आहे. भारतासोबतच्या व्यापार चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कडधान्याच्या आयात शुल्काबाबत चर्चा करावी; अमेरिकेतील शेतकरी आणि भारतीय ग्राहक या दोन्ही घटकांसाठी ते फायदेशीर ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात, २०२० मध्येही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्या वेळी ट्रम्प यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते; ज्यामुळे अमेरिकी शेतकऱ्यांचा आवाज चर्चेत आला, असे ते म्हणाले..तसेच २०१९ मध्ये भारताला सामान्यीकृत पसंती प्रणालीमधून वगळल्यानंतर अमेरिकी कडधान्याच्या निर्यातीवर अधिक शुल्क लावण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची आठवण त्यांनी करून दिली. दरम्यान, अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार अधिक संतुलित करण्यासाठी, कडधान्य पिकांवरील शुल्क कमी करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे..अमेरिकेने काही भारतीय वस्तूंवर जादा आयात शुल्क लागू केले असून, त्यावरून भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. तर सध्या भारत आणि अमेरिका यांच्यामधील व्यापार वाटाघाटीवर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. २०२६ च्या मार्च महिन्यात वाटाघाटी पूर्ण होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.