Market Bulletin: सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणादेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात अनेक ठिकाणी काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. बाजारातील आवक कमीच होती. सोयापेंडचा भावही टिकून आहे. त्यामुळे प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदीचे भाव ५ हजार ४५० ते ५ हजार ५५० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन सरासरी ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. बाजारातील सोयाबीनची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. यामुळे दराला चांगला आधार राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी दिला आहे. .कापूस भाव स्थिरावलेदेशात कापसाचा भाव मागील ४ दिवसांपासून स्थिरावला आहे. कापसाची आवक बाजारात कमीच आहे. तसेच सीसीआयकडेही आवक कमी आहे. कापसाला उठाव चांगला मिळत आहे. सरकीचा भाव राज्यात ४ हजार ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. याचा आधार कापूस भावाला मिळत आहे. सध्या बाजारात कापूस ७ हजार ८०० ते ८ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. कमाल भाव अजही काही बाजारात ८५०० रुपयांच्या दरम्यान मिळाला होता. बाजारातील कापसाची आवक कमी राहून दराला आधार मिळेल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; सोयाबीन स्थिरावले, कापूस आवक कमीच, गाजरला उठाव तर लसणाचा भाव टिकून .मेथी दबावातचराज्यातील बाजारात मेथीचे भाव दबावातच आहेत. बाजारातील आवक आजही जास्त होती. आवकेचा दबाव भावावर दिसून येत आहे. सध्या मेथीला बाजारात शेकडा ४०० ते ६०० रुपये गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहे. तर प्रतिक्विंटल सरासरी ६०० हजार ते १२०० रुपये भाव आहे. राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये मेथीच्या आवकेत वाढ दिसून आली आहे. पुढील काळात आवक आणखी सुधारू शकते. यामुळे दरात काहीसे चढ उतारही दिसू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केला..Agricultural Market: शेतीमाल बाजाराची दिशा काय राहील?.भेंडीचे दर टिकूनराज्यातील बाजारात भेंडीच्या भावात काहीसे चढ उतार दिसून आले होते. पण मागील काही दिवसांपासून भेंडीचे भाव टिकून आहेत. बाजारातील भेंडीची आवक कमीच आहे. सरासरीपेक्षा आवक कमी असल्याने दर टिकून राहण्यास मदत होत आहे. सध्या बाजारात भेंडीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजारांचा भाव मिळत आहे. काही बाजारांमध्ये कमाल भाव ४ हजार ५०० रुपये मिळाला आहे. बाजारातील भेंडीची आवक पुढील काही दिवस स्थिर दिसू शकते. त्यामुळे दर पातळीही काहीशी स्थिरावू शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..मुगाचा भाव कमीचदेशातील मुगाचे उत्पादन यंदा कमी झाल्याचे अंदाज येत आहे. परंतु मुगाचे भाव कमीच आहेत. बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मुगाला उठावही चांगला आहे. असे असले तरी मुगाच्या भावाला याचा आधार मिळताना दिसत आहे. सध्या बाजारात मूग सरासरी ६ हजार ४०० ते ७ हजारांच्या दरम्यान विकला जात आहे. तर हमीभाव ८ हजार ७६८ रुपये आहे. म्हणजेच मुगाची विक्री हमीभावापेक्षा कमी भावात करावी लागत आहे. याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. मुगाचे भाव पुढील काही आठवडे दबावातच राहू शकतात, असा अंदाज मूग बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.