urad dal price: वाढती आयात आणि देशातील बाजारातील आवक यामुळे उडदाचे भाव दबावात आहेत. बाजारात सध्या उडीद ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयाने विकला जात आहे. देशातील बाजारात नव्या मालाची आवक आणि सरकारने लादलेले स्टाॅक लिमिट यामुळे गव्हाचे भाव स्थिरावले आहेत. गव्हाचे भाव मागील महिनाभरात जवळपास २०० रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या गहू २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. बाजारातील पेरुची आवक मागील ३ आठवड्यांपासून मर्यादीत दिसत आहे. पावसामुळे पेरुला उठावही कमी आहे. सध्या पेरू ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. बाजारातील दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली. तर दोडक्याला चांगला उठाव आहे. आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजार ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान पोचला. राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे. तर दुसरीकडे मागणी आहे. त्यामुळे हिरवी मिरची ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयाने विकली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.