Illegal HTBT Seed Smuglling: ‘एचटीबीटी’ची तस्करी रोखण्यासाठी राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये उच्चस्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे..यासंदर्भात माहिती देताना एका कृषी सहसंचालकाने सांगितले, की एचटीबीटी (तणनाशक सहनशील जनुकीय परावर्तित) कापूस बियाण्यांची तस्करी रोखण्याचे काम कृषी विभागाच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा (एसएओ) समावेश असलेल्या उच्चस्तरीय समित्या स्थापन केल्या जातील..Illegal HTBT Cotton Seed: जांगडगुत्ता ‘एचटीबीटी’चा!.एचटीबीटीच्या समस्येबाबत कृषी आयुक्तालयाने यापूर्वीच काही जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा पोलिस प्रमुखांशी पत्रव्यवहार केला आहे. खरीप हंगामापूर्वीच पोलिस व महसूल यंत्रणांशी संपर्क साधून बैठकांचे आयोजन करावे, असे एसएओंना सांगण्यात आले आहे. या बैठकांमधून एचटीबीटी बियाण्यांची तस्करी, उपाययोजना स्पष्ट केल्या जातील. कृषी विभागाच्या गुणनियंत्रण कामकाजासाठी नेमक्या कोणत्या स्तरावर कशी मदत अपेक्षित आहे, याची पूर्वकल्पना पोलिस व महसूल विभागाच्या यंत्रणांना दिली जाणार आहे..नियोजनाची जबाबदारी ‘जेडीए’वर सोपविणारसूत्रांच्या म्हणण्यानुसार, एचटीबीटी बियाण्यांबाबत तपासणीचे नियोजन करण्याची जबाबदारी विभागीय कृषी सहसंचालकांना (जेडीए) देण्यात आली आहे. कापूस उत्पादक जिल्ह्यांमधील कपाशीची लागवड होणारी गावे, या गावांमधील बियाणे विक्रेते, पुरवठादार, बियाणे कंपन्या यांची माहिती घेतली जाणार आहे. या गावांमध्ये संशयास्पद कंपन्यांवर नजर ठेवली जाईल. तेथील शेतांमधून तपासणीसाठी नमुनेही घेतले जाणार आहेत. नमुना काढताना अक्षांश- रेखांशासह जिओ टॅगिंग व छायाचित्रदेखील काढले जाणार आहे..HTBT Cotton: कापूस बाजारपेठेला ‘एचटीबीटी’चा धसका.‘सीआयसीआर’ची मदतएचटीबीटीची भेसळ ओळखण्यासाठी कृषी विद्यापीठांमधील जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक जेडीएच्या अखत्यारीत असलेल्या कापूस लागवड भागातून दोन विशेष नमुने काढले जातील. या नमुन्यांची तपासणी नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्रातून (सीआयसीआर) केली जाणार आहे. त्यामुळे तपासणीत संदिग्धता राहणार नाही, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे..बीटी आणि एचटीबीटीसाठी प्रशिक्षणशेतकऱ्यांना विकल्या जाणाऱ्या बीटी बियाणे पाकिटात ‘क्राय १ एसी’ व ‘क्राय २ एबी’ हे जनुक आहे की नाही, हे तपासले जाईल. तसेच एचटीबीटीच्या चाचणीसाठी तणनाशक प्रतिरोधक (आरआरएफ-एचटी) जनुकाची (सीपी ४-ईपीएसपीएस) तपासणी केली जाईल. या तपासणी प्रक्रिया नेमक्या कशा पद्धतीने होतील, याची शास्त्रोक्त माहिती देण्यासाठी राज्यातील कृषी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.