Maharashtra Rain Update: एकीकडे राज्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाचे सावट निवळत असले तरी दुसरीकडे मात्र अनेक ठिकाणी पावसाला पोषक हवामान कायम आहे. आज (ता. ५) मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..मराठवाड्यापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. शनिवारी (ता. ४) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये ओडिशातील जर्सुगुडा येथे देशातील उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पंजाबच्या भटिंडा येथे नीचांकी १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. किमान तापमानात वाढ कायम असल्याने रात्री उकाडा टिकून आहे. शनिवारी (ता. ४) अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला येथे ३९.१ अंश, तर सोलापूर, परभणी, ब्रह्मपुरी, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशीम येथे पारा ३८ अंशांपार होता. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता.आज (ता. ५) मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..शनिवारी (ता. ४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३३.७---१८.१अहिल्यानगर---निरंक---१९.७धुळे---३५.८---१५.८जळगाव---३४.८---२२.७जेऊर---३५.०---२१.५कोल्हापूर---३३.१--२२.०महाबळेश्वर---२७.६---१७.२.मालेगाव---३७.२---१७.८नाशिक---३३.७---१८.०निफाड---३५.०---१५.७सांगली---३५.९---२२.६सातारा---३४.७---१९.७सोलापूर---३८.३---२३.२सांताक्रूझ---३२.८---२२.७डहाणू---३२.३---२२.२रत्नागिरी---३२.२---२४.०छत्रपती संभाजीनगर---३५.२---२२.८धाराशिव---निरंक---२०.०.Rain Forecast: राज्यात वादळी पावसाची शक्यता.परभणी---३८.०---२१.८परभणी (कृषी)---३७.२---२२.८अकोला---३९.१---२२.०अमरावती---३९.८---१९.९भंडारा---३७.०---२१.०बुलडाणा---३७.२---२४.०ब्रह्मपुरी---३८.४---२२.१.चंद्रपूर---३७.८---२५.०गडचिरोली---३७.६---२२.०गोंदिया---३८.०---२१.६नागपूर---३८.०---२१.६वर्धा---३८.६---२४.०वाशीम---३८.२---१७.४यवतमाळ---३७.०---२२.८.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१५.७---३७.२पश्चिम महाराष्ट्र---१७.२---३८.३मराठवाडा---२०.०---३८.०विदर्भ---१७.४---३९.८कोकण---२२.२---३२.८.वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :अमरावती ३९.८, अकोला ३९.१..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.