Pomegranate Farming Agrowon
Video

Pomegranate Farming: 'या' महिन्यात डाळिंबाचा बहार धरल्यास होईल अधिक फायदा

Pomegranate Management: डाळिंबाला आंबिया बहार, मृग बहार आणि हस्‍तबहार असे तीन बहार येतात.

Team Agrowon

Dalimb Sheti: जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात आंबिया बहार धरला जातो. जून- जुलै महिन्यात मृग बहार धरला जातो. तर सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात हस्त बहार धरला जातो. यापैकी आंबिया बहार धरणं जास्त फायदेशीर आहे. कारण या बहाराची फळे जून - ऑगस्ट काळात तयार होतात. म्हणजे फळ तयार होण्‍यास फूले लागण्‍यापासून साधारणतः ६ महिने लागतात, त्यामुळे अंबिया बहारामध्ये फळांची वाढ होताना आणि फळे तयार होताना हवा उष्‍ण आणि कोरडी राहते. त्‍यामुळे फळाला चांगली गोडी येते. त्यामुळे डाळिंबाला चांगलं मार्केट मिळते. फळांवर किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीनेदेखील आंबिया बहार फायदेशीर आहे.परंतु जर तुमच्याकडे पाण्‍याची कमतरता असेल तर मृगबहार धरावा.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

Water Storage: देशातील मोठी ४० टक्के धरणे निम्मी रिकामी, महाराष्ट्रात किती पाणीसाठा?

Unseasonal Rain Damage: धाराशिव जिल्ह्यात दीड हजार हेक्टरला पूर्वमोसमीचा फटका

Farmers Agitation: अन्नत्यागातून शेतकऱ्यांप्रति सहवेदना

Paddy Disease: धान पिकावर करपा रोग

SCROLL FOR NEXT