Milk Production Agrowon
Video

Milk Production: दूध दराच्या प्रश्नावर राज्य सकारचं झोपेचं सोंग

Milk Rate: महाराष्ट्र शेजारच्या गुजरात, कर्नाटक, केरळ, पंजाब, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यांमध्ये दुधाला प्रति लीटर ३४ रुपयांहून अधिकचा दर मिळतोय.

Team Agrowon

Milk Union: महाराष्ट्रात मात्र काही खाजगी दूध संघांनी आणि सरकारनं मेहनत नासावलीय. राज्यात तब्बल ७६ टक्के दूध संकलन खाजगी कंपन्यांकडे आहे. तर जेमतेम २४ टक्केच दूध सरकारी आणि सहकारी संस्थांकडे आहे. त्यामुळं खाजगी दूध संघाचा मनमानी कारभार राजरोस सुरूचय. वाटेल तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारातील भुकटी दराचं कारण पुढं करून दूध दरात कपात केली जातेय. पण यावर राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मात्र मौन धरून आहेत. खाजगी दूध संघावर राज्य सरकारला बंधनं घालता येत नाहीत, असा विखे यांचा युक्तिवाद आहे. पण तोही अर्धवट आहे. राज्य सरकारला खाजगी दूध संघावर बंधनं घालता येत नसली तरी नियमन तर करता येतं, याचा विखेंना विसर पडल्याचं दिसतं. मागील वर्षी राज्यात दूध दराचा प्रश्न उतू गेला. मंत्री विखे यांच्या जिल्ह्यातच दूध उत्पादकांनी आंदोलन केली. मोर्चे काढले. त्यानंतर विखे यांनी दूध दरासंबंधी एक समिती गठित करण्याचं आश्वासन दिलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT