Jowar rate agrowon
Video

Ginger Market Price: आले दर स्थिर; तसेच काय आहेत आजचे हिरवी मिरची, दोडका, डाळिंब आणि ज्वारीचे बाजारभाव

market rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण आले, हिरवी मिरची, दोडका, डाळिंब आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

Ginger rate: राज्यातील बाजारात आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर आहेत. सध्या आल्याला २५०० ते ३ हजार रुपये भाव मिळत आहे. राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे. हिरवी मिरची ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयाने विकली जात आहे. बाजारीत दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली. तर दोडक्याला चांगला उठाव आहे. आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजार ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान पोचला. डाळिंबाला बाजारात सध्या चांगला उठाव आहे. सध्या बाजारात डाळिंबाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीचे उत्पादन चांगले झाल्याने दरावर दबाव असल्याचे दिसत आहे. दरपातळी २०० ते ३०० रुपयांनी कमी झाली होती. ज्वारीला सरासरी प्रतिक्विंटल २६०० ते २८०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID: 'फार्मर आयडी' नोंदणीची प्रक्रिया खरंच किचकट आहे का?, कृषिमंत्री म्हणाले...

Biological Pest Control: कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव

Sangli APMC: बाजार समिती सभापतिपदी आनंदराव नलवडे बिनविरोध

Wild Fruits: ग्रीष्मातील दाह शमविणारी रानफळे

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्जाचे १८ टक्के उदिष्ट साध्य

SCROLL FOR NEXT