crop insurance scheme agrowon
Video

Pik Vima Bharpai: सुधारित पीकविमा योजना खरिप २०२५ पासून राबविण्यास मान्यता

सुधारित पीक विमा योजनेत पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत नुकसान झाल्यास केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे. तसेच एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली. शेतकऱ्यांना आता केंद्राने ठरवून दिल्याप्रमाणे विमा हप्ता भरावा लागणार आहे.

Team Agrowon

पीक विमा योजनेत बदल करण्याचा निर्णय नुकताच राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला होता. पीक विमा योजनेत कोणते बदल असतील ? याविषयीचा शासन आदेश राज्य सरकारने शुक्रवारी (ता.९) काढला. सुधारित पीक विमा योजना खरिप २०२५ आणि रब्बी २०२५-२६ हंगामात राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच पीक योजना राबविली जाणार आहे. राज्याने घेतलेले ४ अॅड ऑन कव्हर्स म्हणजेच विमा जोखमीच्या बाबी काढून टाकण्यात आल्या आहेत. पिकाचे नुकसान काढताना भात, गहू आणि कापूस या पिकांचे ५० टक्के उत्पादन तंत्रज्ञान आधारित गृहीत धरले जाईल, तर ५० टक्के उत्पादन पीक कापणी प्रयोगातून गृहीत धरले जाणार आहे. इतर पिकांचे नुकसान पीक कापणी प्रयोगातूनच काढले जाईल. सुधारित पीक विमा योजना राबविण्यात येणार असल्याने राज्य सरकारने कंपन्यांसोबतचे आधीचे करार रद्द केले. तसेच सुधारित योजना राबविण्यासाठी विमा कंपन्यांसोबतच करार केले जाणार आहेत. त्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT