Jantar-Mantar Season 2 Protest: 'कॉकरोच जनता पार्टी'चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी पुन्हा आंदोलनाचे संकेत दिले आहेत. त्यांच्या 'जंतर-मंतर'वरील आंदोलनाचा 'सीझन २' म्हणजेच भाग २ लवकरच सुरू होईल, असे त्यांनी म्हटले आहे. ''जंतर-मंतर’चा दुसरा भाग कधी सुरू होणार? याबाबत अनेक लोक समाजमाध्यमावर विचारणा करत आहेत. यावर मी त्यांना सांगू इच्छितो की, 'जंतर-मंतर’ आंदोलनाचा भाग २ लवकरच सुरू होईल," असे दिपके यांनी स्पष्ट केले. .पण त्यांचे पुढील आंदोलन नेमके कधी अथवा कुठे होईल? तसेच त्या माध्यमातून कोणत्या मागण्यांवर भर दिला जाईल? याबाबत दिपके यांनी अधिक माहिती दिलेली नाही. पण दिल्लीतील 'जंतर-मंतर'वरील 'सीजेपी'च्या आंदोलनानंतर ते पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत असल्याचे संकेत त्यांच्या बोलण्यावरून मिळत आहेत..दिपके यांनी पुढे म्हटले आहे की, आज दिल्लीत आमच्या स्वयंसेवकांची बैठक होणार होती. आम्ही त्यासाठी जागेचा शोध घेत होतो. पण कोणीही हॉल भाड्याने द्यायला तयार नाही. सगळीकडे लोक सांगत होते की त्यांच्यावर वरून दबाव आहे. मोठ्या अडचणीनंतर 'सीजेपी'ने एक हॉल आरक्षित केला होता. आमच्याकडे त्याची पावतीदेखील आहे, असा दावा त्यांनी केला. हॉल देऊ नये म्हणून संबंधित मालकाला धमकी मिळाली. हे सर्व भाजपकडून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. .CJP Campaign: कॉक्रोच जनता पार्टीचे देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ कॅम्पेन.'सीजेपी'ची स्वातंत्र्यदिनापासून मोहीम 'जंतर मंतर भाग २'वर सीजेपी मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी सांगितले की, हा तर भाग २ आहे. अकार्यक्षम सरकार आणि अधिकाऱ्यांविरुद्ध देशभरात आंदोलने होत आहेत. 'सीजेपी'च्या वतीने जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही आता देशव्यापी दौरा सुरू करत आहोत. आम्ही एक मोहीम सुरु करणार असून, शिक्षणाच्या मुद्द्याला आमचे प्राधान्य राहील. त्यासाठी स्वातंत्र्यदिनापासून मोहीम सुरु करत आहोत. आम्ही पालक आणि नागरिकांना आवाहन करत आहोत की, त्यांनी त्यांची मुले शिकत असलेल्या सरकारी शाळांना भेट द्यावी. तेथील परिस्थिती पाहावी आणि वास्तव निदर्शनास आणून द्यावे. तसेच तेथील परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करावी. यामुळे खऱ्या अर्थाने 'विकसित भारत' लवकरच उदयास येईल..CJP Protest: सरकारनं शब्द पाळवा अन्यथा पुन्हा आंदोलन करु, पोलिसांच्या कारवाईवरुन 'सीजेपी'चा निर्वाणीचा इशारा.याआधी 'कॉकरोच जनता पार्टी'ने दिल्लीतील जंतर-मंतरवर ३६ दिवस आंदोलन केले होते. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले. तसेच त्यांच्या इतर मागण्याही सरकारने मान्य केल्या होत्या. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.