Farmer Agrowon
Video

Farmer: नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा

Namo Shetkari Yojana: ९० लाख ८८ हजार ४२ शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्याचं वाटप करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Maharashtra Goverment: राज्य वित्त विभागाने हप्ता देण्यासाठी मान्यता दिलीय. त्यामुळं शेतकऱ्यांना चौथा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. म्हणजेच राज्यातील जवळपास ९० लाख ८८ हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता पुढच्या दोन दिवसात मिळण्याची शक्यताय. जास्तीत जास्त शनिवारपर्यंत नमो सन्मानचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. आता अशी एक चर्चा आहे की, चौथा आणि पाचवा हप्ता एकाच  दिवशी जमा करण्यात येणार आहे. म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना चौथा आणि पाचवा हप्ता देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशीलय. पण केवळ एकाच हप्त्याच्या वितरणाला वित्त विभागानं सोमवारी (ता.१९) मंजुरी दिल्याचं समजतंय. त्यामुळं कृषी विभागाकडून पाचवा हप्ता पुढच्या महिन्यात देण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. त्यामुळं विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यताय. म्हणजेच एकाच वेळी या योजनेचे दोन हप्ते शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Preparation: शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांचे आतापासूनच नियोजन करा: जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Sindhudurg Water Storage: सिंधुदुर्गातील लघुप्रकल्पांमध्ये केवळ २६.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Sugarcane Crushing: खानदेशात २३ लाख टनांवर ऊस गाळप

Natural Farming: वाशीम जिल्ह्याची नैसर्गिक शेतीकडे वाटचाल

Agriculture Support: शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते उपलब्ध करा: पालकमंत्री संजय शिरसाट

SCROLL FOR NEXT