Maharashtra Farming: खानदेशात ऊस गाळप यंदाही नोव्हेंबरमध्ये सुरू झाले. गाळप पूर्ण झाले असून, यंदाचे गाळप २३ लाख टनांवर गेल्याची माहिती आहे. कारखान्यांनीही गाळपासाठी गतीने कार्यवाही केली. .ऊस गाळपात नंदुरबारने मागील वेळेस आघाडी घेतली होती. नंदुरबारातील समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील खासगी कारखान्याने प्रतिदिन साडेनऊ हजार टन ऊस गाळप केले होते. यंदाही नंदुरबारात तीन साखर कारखाने सुरू होते. धुळ्यात एक लहान कारखाना सुरू होता. तेथे रोज ६०० ते ७०० टन उसाचे गाळप केले जात होते..Sugarcane Crushing: एक कोटी २६ लाख टन उसाचे गाळप.जळगाव जिल्ह्यातही दोन कारखाने सुरू होते. यंदाही नंदुरबारात तीन, धुळ्यात एक व जळगावात एक कारखाना सुरू होता. जळगाव जिल्ह्यात चहार्डी (ता.चोपडा) येथील कारखान्यात गाळप झाले आहे. नंदुरबारातील कारखान्यांकडून अधिकचे गाळप झाले आहे. सर्वाधिक गाळप समशेरपूर येथील कारखान्याने केले आहे. त्यापाठोपाठ जळगावातील कारखान्यांनी गाळप केले..Sugarcane Crushing Season: पुणे जिल्ह्यात गळीत हंगाम अंतिम टप्प्यात.उसाची लागवड नंदुरबारात अधिक होती. तेथे सुमारे १६ हजार हेक्टरवर ऊस पीक होते. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात सुमारे १५ हजार हेक्टरवर ऊस पीक होते. उसाची लागवड नंदुरबारात अधिक असल्याने तेथे ऊस तोडणी व अन्य कार्यवाहीसाठी राबता सतत दिसला. यंदा जानेवारी व मार्च आणि एप्रिलमध्ये पाऊस व गारपीट झाली होती. या कालावधीत काही कारखाने दोन-तीन दिवस बंद होते. परंतु अन्य कालावधीत कारखान्यांत गाळपास गती होती. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव व चोपडा भागात ऊस तोडणी व गाळपासंबंधी कार्यवाही गतीने झाली..अन्य भागातूनही मागणीखानदेशात नाशिक, छत्रपतीसंभाजीनगर व नगर जिल्ह्यातील कारखानेदेखील उसतोडणी करीत होते. धुळ्यातील साक्री, जळगावमधील चाळीसगाव, चोपडा भागात अन्य जिल्ह्यांतील कारखाने येऊन ऊस तोडणी करीत होते. अनेक शेतकऱ्यांनी नाशिक, छत्रपती संभाजीनगरातील कारखान्यांना ऊस दिला. नंदुरबारातील काही शेतकऱ्यांनी गुजरातेतील खासगी कारखान्यांना ऊस दिल्याची माहिती मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.