Farmers Seed and Fertilizer Supply: शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळेवर बियाणे, खते आणि पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले..खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक गुरुवारी (ता. १५) जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. यावेळी इमाव कल्याण, दुग्ध विकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, खासदार डॉ. कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आ. अंबादास दानवे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ. प्रशांत बंब, आ. संजना जाधव,.Farmer Support: प्रयोगशील युवा शेतकऱ्यांना सुविधा द्या : पालकमंत्री डॉ. भोयर.आ. विलास भुमरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते..जिल्ह्याच्या खरीप हंगामाचे नियोजन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी सादर केले. यावेळी लोकप्रतिनिधींनी विविध मुद्दे मांडले. आ. प्रशांत बंब यांनी सांगितले, की बँका शेतकऱ्यांना उद्दिष्टानुसार पीककर्ज वाटप करीत नाहीत. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या विविध अनुदानांवर होल्ड लावून ती रक्कम कर्ज खात्यात जमा केली जाते. खतांचासाठा आवश्यकतेनुसार करावे. तसेच खतांच्या लिंकिंगचा प्रश्न वरिष्ठ पातळीवर मांडून त्यावर तोडगा काढावा..खा. डॉ. कल्याण काळे म्हणाले, की खतांची विक्री निर्धारित दराने होत आहे का, याची वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी. खतांचे लिंकिंग थांबविण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांकडे घरगुती उपलब्ध आहेत. मात्र, त्यांची उगवण क्षमता तपासूनच वापरास प्रोत्साहन द्यावे..Fertilizer Stock: जालना जिल्ह्यात १ लाख २९ हजार टन खतसाठा उपलब्ध.आ. रमेश बोरनारे यांनी खतांचे लिंकिंग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची सूचना केली. संलग्न जिल्ह्यातील शेतकरीही या जिल्ह्यातून खत खरेदी करतात, ही बाब लक्षात घेऊन खत साठ्याची मागणी नोंदवावी. तसेच नजीकच्या रेल्वे स्थानकावरून खतांच्या रॅक उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. आ. विलास भुमरे यांनी शेतकऱ्यांच्या विविध अनुदानांची रक्कम होल्ड करून ती कर्ज खात्यात जमा करण्याच्या प्रकारावर निर्बंध आणावेत, अशी सूचना केली..आ. अंबादास दानवे म्हणाले, की शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी नव्या हंगामासाठी पीककर्ज घेताना जुने कर्ज फेडल्याशिवाय नवे कर्ज मिळत नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी कर्जमाफीस पात्र राहील का, याबाबत संभ्रम आहे. तो दूर करावा. तसेच खतांच्या लिंकिंगप्रकरणी वरिष्ठ पातळीवर कारवाई व्हावी आणि सोयाबीन बियाण्यांच्या उपलब्धतेची खातरजमा करावी..कर्जाविषयी मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडणारखरीप आढावा बैठकीत पालकमंत्री शिरसाट म्हणाले, की कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्याबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत हा विषय मांडण्यात येईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.