बाजारातील कांद्याची आवक चांगली सुरु आहे. काही बाजारांमध्ये अवकाळी पावसामुळे आवकेवर परिणाम दिसत आहे. कांद्याला बाजारात सरासरी ९०० ते ११०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. ज्वारीचे दर मागील दीड महिन्यात क्विंटलमागे किमान ३०० ते ५०० रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारातील ज्वारीची आवक वाढत आहे. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये ज्वारीची आवक चांगली आहे. सध्या ज्वारी वाण आणि गुणवत्तेप्रमाणे २३०० ते ३१०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. बाजारातील आल्याची आवक मागील दोन आठवड्यांपासून कमी दिसत आहे. तर दुसरीकडे लग्नसराईमुळे आल्याला उठाव आहे. मागील दोन आठवड्यांपासून आल्याच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली. आल्याचे भाव सध्या ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. बाजारातील वाढत्या आवकेबरबोर तिळाच्या भावातही नरमाई दिसून आली. बाजारात सध्या तिळाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहेत. बाजारातील चिंचेची आवक मात्र मर्यादीत दिसत आहे. तर चिंचेला बाजारात सध्या मागणी दिसून येत आहे. चिंचेला सध्या ९ हजार ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.