soybean market agrowon
Video

Soybean Rate: नाफेड, एनसीसीएफकडे सोळा लाख टन सोयाबीन शिल्लक

soybean market: चालू सोयाबीन हंगामात म्हणजे ऑक्टोबर २०२४ ते मे २०२५ या आठ महिन्यांच्या कालावधीत देशभरातील बाजारात सुमारे ८३ लाख टन सोयाबीन दाखल झाले आहे. यापैकी ७९ लाख टनांचे गाळप झाले असून, आता शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे केवळ २२ लाख टन सोयाबीन शिल्लक आहे. तर नाफेडकडे १६ लाख टनाचा साठा उपलब्ध आहे. याच कालावधीत १५ लाख टन सोयापेंडची निर्यात झाली असून, त्यात जर्मनी हा सर्वात मोठा खरेदीदार ठरल्याचे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.

Team Agrowon

soybean stock report: मे महिन्यात बाजारात फक्त ६ लाख टन सोयाबीनची आवक झाली होती, तर एप्रिलमध्ये ती ५.५ लाख टन होती. संपूर्ण सोयाबीन हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबर असा असतो. त्यामुळे हंगामातील पहिले आठ महिने पूर्ण झाले असून, सोपाने आवक, गाळप, साठा आणि निर्यातीबाबतची माहिती स्पष्ट केली आहे. ऑक्टोबरपासून मे महिन्यापर्यंत देशातील बाजारात ८३ लाख टन सोयाबीनची आवक झाली होती. त्यापैकी हंगामातील एकूण ७९ लाख टन गाळपातून ६२ लाख टन सोयापेंड तयार झाला. यापैकी ४२ लाख टन देशांतर्गत वापरासाठी गेला आणि सुमारे १५ लाख टन पेंड निर्यात झाला. मात्र यंदाचा उत्पादन-वापर-निर्यातीचा आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असल्याचेही सोपाच्या अहवालात नमूद आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department: अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे आरोपी सुटतात निर्दोष

Crop Insurance Scam: विनयकुमार आवटेंची ‘एसआयटी’ चौकशी करा

Betel Leaf Rate: खाऊच्या पानांच्या दरात घट

Assembly Monsoon Session: सौर पंपांऐवजी वीज पंप देण्याबाबत धोरण आणू: ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

Ethanol Blending: जूनमध्ये इथेनॉल मिश्रण पोचले १९.९ टक्क्यांपर्यंत

SCROLL FOR NEXT