Government investment in farming agrowon
Video

Crop Insurance Scheme: पीकविमा योजना बदलासह राज्य सरकारने नवीन योजनेसाठी दिली मान्यता

राज्य सरकारने कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करण्यासाठी नवीन योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. त्यासाठी पुढील ५ वर्षात दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची अशी एकूण २५ हजार कोटींची तरतुद करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे

Team Agrowon

राज्य सरकार शेतीतील पायाभूत सुविधा निर्मितीवर लक्ष देणार असल्याचं कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच या योजनेतून अत्यल्प, अल्प भूधारक, दिव्यांग आणि महिला शेतकरी ह्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थीचा जिल्हानिहाय लक्षांक निश्चित करण्यात येणार असून फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या तत्त्वावर राबवण्यात येणार आहे, असल्याचं रस्तोगी यांनी प्रसिद्ध पत्रकात सांगतिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.२९) मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत शेती क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना हवामानातील बदलांना तोंड देता यावं, यासाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. तसेच कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी शेततळे, सूक्ष्म सिंचन, ठिबक/ तुषार सिंचन यासारख्या बाबींवर भर देण्यात येणार आहे. तर नियंत्रित शेतीसाठी शेडनेट, हरितगृह, पॉलीहाऊस, संरक्षित शेती, प्लास्टिक अस्तरीकरण, मल्चींग पेपर, क्रॉप कव्हर, काटेकोर शेती, पॅक हाऊस, गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, काढणी पश्चात व्यवस्थापन, कृषि प्रक्रिया, मूल्य साखळी विकसन, शेतमालाच्या ब्रॅंडिंग, पॅकेजिंग, साठवणूक सुविधेसाठी गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस आदि सुविधासाठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी शेळी पालन, फळबाग लागवड, रेशीम उद्योग इत्यादी बाबींसाठी सहाय्य/अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने एकूण पुढील ५ वर्षात २५ कोटी रुपयांची तरतुद करण्यास मान्यता दिली आहे. या निधीच्या एकूण मंजूर निधीपैकी १ टक्के वापर हा शेतकरी आणि इतर घटकांच्या प्रशिक्षण व प्रत्याक्षिकांसाठी करण्यात येणार आहे. तर या योजनेचं तृतीय पक्षाव्दारे (थर्ड पार्टी) मूल्यमापन करण्यासाठी १ टक्के राखीव निधी ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दरम्यान, पीक विमा योजनेत गैरव्यवहारांचं प्रकरण समोर आल्याने राज्य सरकारने १ रुपयांत पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच पीक विमा भरपाईमध्ये नुकसान भरपाईच्या निकषात बदलास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AgriStack: अतिवृष्टिग्रस्तांच्या मदतीत ‘ॲग्रीस्टॅक’चा अडसर?

Farmer Death: शेतकरी आत्महत्यांचे सत्र नांदेड जिल्ह्यात सुरूच

Kharif Onion: मुहूर्तालाच खरीप कांद्याची आवक कमी, दरातही नरमाई

Onion Inspection: अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे कांदा उपलब्धतेची केंद्राला चिंता

Jaggery Price: गुजरातमधून नवरात्रीसाठी गुळाच्या खरेदीत वाढ

SCROLL FOR NEXT