Vidarbha monsoon alert agrowon
Video

Monsoon Rain: राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस हलक्या ते मध्यम सरींची शक्यता

monsoon alert: हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला असून, काही ठिकाणी जोरदार सरीही पडतील, असेही म्हटले आहे.

Team Agrowon

Maharashtra weather forecast: राज्यात जोरदार आगमनानंतर मॉन्सूनचा प्रवास सध्या थांबलेला आहे. त्याचबरोबर पावसाचे प्रमाणही कमी झालेले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मॉन्सून २८ मे रोजी राज्यात दाखल झाल्यानंतर मुंबई, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांपर्यंत पोहोचला होता. मात्र, त्यानंतर मॉन्सूनचा वेग कमी झाला आणि त्याचा पुढील प्रवास थांबलेला आहे. सध्या मॉन्सूनची सीमा मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट या भागांपर्यंत मर्यादित आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाची नोंद झाली असली, तरी राज्यभरात पावसाचे प्रमाण तुलनेत कमी आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला असून, काही ठिकाणी जोरदार सरीही पडतील, असेही म्हटले आहे. आज आणि उद्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. बुधवारच्या दिवशी विदर्भातील सर्व जिल्हे, खानदेश आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात सोमवार ते शुक्रवार या कालावधीत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Policy Implementation: पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करा: जिल्हाधिकारी वर्षा मीना

Fruit Export Impact: निर्यातयोग्य फळ स्थानिक बाजारात आल्याने दरावर परिणाम

Women Agri Tools: महिलांसाठी कृषी अवजारे

Inspiration Story: कुबेराहून श्रीमंत असणारा गरीब

Ethanol Policy: इथेनॉलबाबत धोरणात्मक निर्णय आवश्यक

SCROLL FOR NEXT