hydroponic green fodder agrowon
Video

Hydroponics Fodder: हायड्रोपोनिकमध्ये चारा उत्पादनाची प्रक्रिया कशी?

hydroponic green fodder: अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागात हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान अधिक स्वस्त, सोपे आणि कार्यक्षम बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संशोधनात यूपीव्हीसी पाइप, शेडनेट आणि एलईडी दिव्यांचा वापर करून तयार केलेल्या संरचनेतून अधिक प्रभावी चारा उत्पादन शक्य असल्याचे निष्पन्न झाले.

Team Agrowon

benefits of hydroponic fodder: खरिपात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता असली तरी वर्षभर चाऱ्याची उपलब्धता सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कठीण असते. त्यामुळे अलीकडे बरेच शेतकरी हायड्रोपोनिक पद्धतीने चारा निर्मिती करण्याकडे वळले आहेत. मात्र, सध्या वापरली जाणारी संरचना लोखंडी अँगलवर आधारित असून महागडी व गुंतागुंतीची असते. त्यामुळे कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने सोपे, स्वस्त व कार्यक्षम मॉडेल तयार करण्यासाठी संशोधन केले. विभाग प्रमुख डॉ. सुचिता गुप्ता, राजेश मुरूमकार आणि अजय तळोकार यांनी संपूर्ण यंत्रणा, डिझाइन, सिंचन, बियाण्यांची निवड इ. घटकांचा अभ्यास करून प्रभावी हायड्रोपोनिक युनिट विकसित केले. हे मॉडेल अनेक शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर

Eknath Shinde: एकनाथ शिंदे नाराज? रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत धुसफुस ?

Khandesh Water Crisis : पावसाअभावी प्रकल्पांतील आवक अल्प

Farmer's Jal Samadhi Protest : युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात गोदापात्रात आंदोलन

Pm Surya Ghar Yojana : ‘सूर्यघर’चा जिल्ह्यातील ८५३३ ग्राहकांना लाभ

SCROLL FOR NEXT