Poultry Stress Management agrowon
Video

Poultry Stress Management: उन्हाळयात कोंबड्यांतील उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

राज्यात बहुतांश ठिकाणी वाढत्या कमाल तापमानामुळे उन्हाचा चटका कायम आहे. उष्ण वातावरणामुळे जनावरे, कोंबड्यांमध्ये ताण निर्माण होतो त्यामुळे त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनावरही परिणाम होतो. उष्माघातामुळे कोंबड्यांमध्ये मरतूक देखील दिसून येते. ज्यावेळी शरीर उष्णता उत्पादन आणि शरीरातील उष्णता कमी राखण्यास सक्षम नसते अशावेळी कोंबड्यांमध्ये उष्णतेमुळे अधिक ताण दिसून येतो.

Team Agrowon

उष्ण हवामानामुळे कोंबड्यांमध्ये ताण निर्माण होतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या उत्पादनावर होतो. उष्णतेमुळे शरीरातील तापमान नियंत्रित न राहिल्यास ताण वाढतो. कोंबड्या गादी सरकवून जमिनीवर पसरून बसतात, पाण्याजवळ राहून थंड होण्याचा प्रयत्न करतात. तापमान ३५°C पेक्षा जास्त झाल्यास शेडमध्ये भरपूर हवा आणि थंड छत गरजेचे असते. यासाठी छतावर सुक्या चाऱ्याचे आच्छादन किंवा पाण्याची फवारणी उपयोगी ठरते. ताण कमी करण्यासाठी औषधी वनस्पती व जीवनसत्त्वांचा आहारात वापर महत्त्वाचा आहे. आवळा, संत्री, लिंबूवर्गीय फळे आणि त्यांची साल यांचा वापर करावा. अश्वगंधा, तुळस, मंजिष्ठा, शतावरी यांचे मिश्रण खाद्यात वापरावे. सकाळी आणि संध्याकाळीच खाद्य द्यावे; दुपारी टाळावे. थंड वेळेत दिलेले खाद्य ताण कमी करते. खाद्यात जीवनसत्त्व ई २५० मिलग्रॅम आणि क ४०० मिलीग्रॅम द्यावे. इलेक्ट्रोलाईटस, डेक्सट्रोज, वनस्पती तेलातून फॅटचा वापरही उपयुक्त ठरतो. योग्य उपाययोजनांनी कोंबड्यांना उष्णतेच्या ताणापासून वाचवता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Death: गाई दगावण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट!

Cucumber Cultivation: उन्हाळ्यात काकडीची लागवड कशी करावी?

Sugarcane Farmer Issue: थकीत एफआरपीसाठी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

Floriculture Park Crisis: वीज अनुदान बंद झाल्याने फ्लोरिकल्चर पार्क अडचणीत

AI security Challenges: ‘एआय’च्या वापरात डेटा सुरक्षेचे आव्हान

SCROLL FOR NEXT