Devlane Village Incident: येवला तालुक्यातील देवळाणे येथे शेतकरी दांपत्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या प्रकरणाचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तपासात पोलिसांना मदत करण्याचा आव आणणारा ‘पोलिस मित्र’च या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी काका-पुतण्याला बेड्या ठोकल्या आहेत..नेमकी घटना काय?देवळाणे येथील शेतकरी भाऊसाहेब बर्डे आणि त्यांच्या पत्नी कांता बर्डे शनिवारी (ता. ९) रात्री घराच्या गच्चीवर झोपलेले असताना, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अॅसिड फेकले. या भीषण हल्ल्यात दांपत्य गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर येवला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत..Political Crime Case: आमदार प्रवीण तायडेंच्या भावाला ठार मारण्याचा कट.घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली होती. संशयित चांगदेव देवराम मोरे (वय ४०) हा ‘पोलिस मित्र’ म्हणून पोलिसांच्या संपर्कात होता. स्वतः वरील संशय टाळण्यासाठी तो पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करत होता..Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत.इतकेच नाही तर, दुसऱ्याच्या नावाची चिठ्ठी टाकून तपासाचा रोख वळवण्याचाही त्याने प्रयत्न केला. मात्र, त्याच्या जबाबातील विसंगतीमुळे पोलिसांना संशय आला आणि कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या पुतण्याच्या सचिन जालिंदर कोटमे मदतीने हा कट रचल्याची कबुली दिली..पोलिसांची तत्परताग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि येवला तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि चौकशीच्या आधारे अवघ्या दोन दिवसांत गुन्ह्याची उकल केली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे,पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, उपनिरीक्षक शैलेश पाटील, हर्षवर्धन बहीर यांच्यासह पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.