Climate Change Challenge: बदलती हवामान परिस्थिती, वाढता उत्पादन खर्च व जमिनीची घटणारी सुपीकता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा. यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शाश्वत शेतीमुळे उत्पादन खर्च कमी होतो.मातीची गुणवत्ता सुधारते व पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. .त्यामुळे शेतीचा विकास साध्य होतो. त्यानुषंगाने शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीकडे वळून पर्यावरणपूरक शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले. शासकीय विश्रामगृहात मंत्री श्री. भुसे यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम पूर्व नियोजन व टंचाई आढावा बैठक मंगळवारी (ता. १२) रोजी झाली. त्यावेळी ते बोलत होते..Sustainable Farming: शाश्वत शेती फेरपालट महत्त्वाचा.यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, उपविभागीय कृषी अधिकारी संदीप मेढे, महावितरणचे अधीक्षक अभियंता जगदीश इंगळे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे, तहसीलदार विशाल सोनवणे, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र शिलावट, गायत्री सोनवणे, काष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे प्रमुख सचिनकुमार नांदगुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. एस. माळी, भूमी अभिलेख उपअधीक्षक अल्पेश पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव आदी उपस्थित होते..मंत्री श्री. भुसे म्हणाले, की शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा अतिरेक टाळून सेंद्रिय खतांचा वापर करावा. पाणी बचतीसाठी ठिबक सिंचन तसेच मातीची सुपीकता टिकवण्यासाठी पीक फेरपालट यांसारख्या उपाययोजना कराव्यात. तसेच तालुक्यात जलतारा प्रकल्पांतर्गत ‘हर खेत को पानी’ योजनेअंतर्गत भूजल पुनर्भरणाचा अभिनव प्रयोग प्रभावीपणे राबविण्यात यावा..Sustainable Farming: देशी बियाण्यांच्या बळावर विकसित केले ‘शाश्वत शेतीचे मॉडेल’.ग्रामीण भागातील शेत व पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी पूर्णपणे यंत्रसामग्रीच्या सहाय्याने जलदगतीने कामे करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना संबंधित यंत्रणा व लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्यात यावी, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. खतांची टंचाई भासू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. खरीप हंगामासाठी खते, बियाणे व गुणवत्तापूर्ण निविष्ठा शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे..तालुक्यातील संभाव्य टंचाईसदृश परिस्थिती पाहता, टंचाईच्या काळात पाण्याचे योग्य नियोजन करून प्रत्येक गावाने पाण्याचा वापर काळजीपूर्वक व काटेकोरपणे करावा. यावेळी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे अनुदान वितरित करण्यात आले. तसेच शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान कुटुंबातील वारसांना धनादेशाद्वारे सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले. यावेळी मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते कृषी विभागाच्या विविध योजनांच्या पुस्तिका व घडीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.