Fowl cholera in chickens agrowon
Video

Poultry Diseases: कोंबड्यांमध्ये फाउल कॉलरा कसा ओळखावा आणि त्यावर उपाय काय?

काहीवेळा कोणतीही लक्षणे न दाखवता कोंबड्यामध्ये अचानक मरतूक होते. तर खूप कमी कोंबड्यांमध्ये हिरवट अतीसार, विस्कटलेले पंख, जलद श्वसन अशी लक्षणे दिसतात. अशावेळी कोंबड्यांना फाउल कॉलरा म्हणजेच पटकी हा संसर्गजन्य रोग झाला असण्याची शक्यता असते. या रोगामुळे कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात मरतूक होते. काही वेळा रोगाची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. या आजाराची कारणे, लक्षणे आणि उपाय काय आहेत? याविषयीची माहिती आपण या व्हिडीओतून घेऊया.

Team Agrowon

फाउल कॉलरा हा जिवाणूजन्य संसर्गजन्य रोग असून, सेप्टीसेमियामुळे बाधित कोंबड्या अचानक मरतात. हा आजार ब्रॉयलर आणि लेअर दोन्ही प्रकारच्या कोंबड्यांना होतो. थंड आणि दमट हवामानात याचा प्रादुर्भाव वाढतो. बाधित कोंबड्यांच्या लाळ, शेंबूड आणि अश्रूंमधून तसेच उंदीर, घुशी आणि इतर प्राण्यांमुळे रोगाचा प्रसार होतो. आजारी कोंबड्यांमध्ये हिरवट अतिसार, विस्कटलेले पंख, जलद श्वसन, डोळ्यांची सूज आणि लंगडणे ही लक्षणे दिसतात. शेड स्वच्छ ठेवणे, निर्जंतुकीकरण करणे आणि लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. आजारी कोंबड्या वेगळ्या ठेऊन पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविके द्यावीत. मृत कोंबड्यांना योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. योग्य काळजी घेतल्यास फाउल कॉलरावर नियंत्रण मिळवता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT Portal Technical Issues: महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी त्रस्त

Water Shortage Issue: पाण्याअभावी तीन हजार हेक्टरवरील ऊस धोक्यात; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Agricultural Dealers Licence Suspended: सोलापुरातील १०७ कृषी विक्रेत्यांचे परवाने निलंबित; कृषी विभागाची मोठी कारवाई

Sugarcane Workers Children Admission: सिन्नर येथे ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू

Bhandardara Dam Reservoir : भंडारदरा धरणात अवघा २१ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT