Solapur Agri Input Regulation: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खते उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम राबविली आहे. या मोहिमेत खतांचा काळाबाजार, साठेबाजी, कृत्रिम टंचाई आणि चढ्या दराने खतांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. .आतापर्यंत १०७ खत विक्री परवाने निलंबित, ६ परवाने रद्द करण्यात आले असून, ७ केंद्रांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजूरकर यांनी दिली..Agri Shops License Suspended: खरिपाच्या तोंडावर कृषी विभागाची कारवाई; १७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित!.पुणे विभागांतर्गत सोलापूर जिल्ह्यात कृषी विभागाने सर्वाधिक धडक कारवाई केली आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण १,१२९ केंद्रांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये १८ खतांचे नमुने निकृष्ट दर्जाचे आढळले. .Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द.यावरून ६४ परवाने निलंबित तर ४ परवाने रद्द करण्यात आले असून ४ केंद्रांवर गुन्हे दाखल झाले आहेत..दृष्टिपथात केलेली कारवाई याप्रमाणेतपासणी केलेली केंद्रे: १,१२९निकृष्ट खतांचे नमुने: १८निलंबित परवाने: १०७रद्द परवाने: ७दाखल गुन्हे: ७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.