rain update agrowon
Video

Monsoon Rain: विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज

monsoon alert: राज्यातील काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल हवामान तयार झालं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Team Agrowon

rain alert: राज्यात मॉन्सून गेल्या १२ दिवसांपासून स्थिर आहे. राज्यातील काही भागांमध्ये वातावरण पावसासाठी पोषक बनत असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर थोडा अधिक राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातील परभणी, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्येही पुढील पाच दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यांमध्येही काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT