Poultry Disease agrowon
Video

Poultry Disease: कमी खाद्यात कोंबड्यांचे जास्त वजन वाढविण्याचे घातक परिणाम

सध्याच्या काळात ४५ ते ५० ग्रॅम वजनाच्या ब्रॉयलर पिलाचे ३८-४० दिवसांत २.५ ते २.७ किलो वजन भरते. अशा परिस्थितीत वातावरणातील बदल, व्यवस्थापनातील त्रुटी, आहार व्यवस्थापन आणि खाद्याच्या गुणवत्तेत बदल झाल्यामुळे कोंबड्यांना विविध आजार होतात.

Team Agrowon

कुक्कुटपालनात कमीत कमी खाद्य वापरून जास्तीत जास्त वजनाची ब्रॉयलर कोंबडी तयार करण्याकडे अनेक कुक्कुटपालकांचा भर असतो. पण कोंबडीचे फुफ्फुस आणि हृदय यांची वाढ मात्र त्या वेगाने होत नाही. त्यामुळे कोंबडीच्या वाढत्या शरीराला हे अवयव  प्राणवायूचा पुरवठा करण्यास सक्षम राहत नाहीत. या अवयवांवर अतिरिक्त कामाचा ताण येतो आणि त्यांच्यात बिघाड होतो. कोंबड्यांच्या वाढीनुसार ऑक्सिजनची गरज वाढते. हृदय आणि फुफ्फुस जास्तीतजास्त रक्तपुरवठा करण्याचा प्रयत्न करते. पण रक्ताचा दाब वाढल्यामुळे रक्तातील पाणी कोबड्यांच्या फुफ्फुसात आणि ओटीपोटात साचण्यास सुरुवात होते, त्यामुळे  कोंबडीचा मृत्यू होतो. साधारणतः चार आठवडे वयापुढील ब्रॉयलर कोंबडीमध्ये मरतुकीचं प्रमाण हे जास्त असतं. त्यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं. सध्याच्या काळात ४५ ते ५० ग्रॅम वजनाच्या ब्रॉयलर पिलाचे ३८-४० दिवसांत २.५ ते २.७ किलो वजन भरते. अशा परिस्थितीत वातावरणातील बदल, चुकीचं व्यवस्थापनात आणि कमी प्रतीच्या खाद्या मुळे कोंबड्यांना विविध आजार होतात. अशा वेगाने वजन वाढणाऱ्या  कोंबड्यांमध्ये पचन क्रियेचा वेग देखील जास्त असतो. त्यामुळेच कोंबड्यांना जलोदर हा आजार होतो. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahabeej Biofertilizers: जैविक निविष्ठांच्या विक्रीतून ‘महाबीज’ला २.३९ कोटींचा महसूल

Vidarbh Fuel Shortage: विदर्भात ऐन खरीप हंगामात डिझेल टंचाईचा फटका

Nanded Diesel Shortage: नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेल उपलब्धतेबाबत संभ्रम

Cotton, Soybean Rate: कापूस, सोयाबीनमधील तेजी टिकून तूर, मका हरभरा भाववाढीचे संकेत

Solapur Diesel Shortage: पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे ग्रामीण भागातील मशागतीची कामे खोळंबली

SCROLL FOR NEXT