Animal Care Agrowon
Video

Animal Care: जनावरांमधील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी असा आहार द्या

Animal Diet: हाड व दातांची उत्तम वाढ होण्यासाठी, रक्त गोठवण्यासाठी कॅल्शिअमची गरज असते. जनावरांच्या शरीरामध्ये पाण्याचे संतुलन राखण, ऑस्मॉटिक प्रेशर संतुलन करण्यासाठी उपयुक्त ठरतं. कॅल्शिअम मांस पेशी आणि मज्जा संस्थेवर नियंत्रण ठेवतं.

Team Agrowon

Animal Food: जनावरातील कॅल्शिअमची कमतरता कमी होण्यासाठी त्यांना नियमित खाद्यातून कॅल्शियमयुक्त क्षार मिश्रणे द्यावीत. मोठ्या जनावरांत ५० ते १०० ग्रॅम तर लहान जनावरांना १५ ग्रॅम कॅल्शियमयुक्त क्षार मिश्रणांचा पुरवठा करावा. याशिवाय द्विदल पिकाचा पालेदार चाराही द्यावा. कॅल्शिअमची कमतरता होऊ नये म्हणून रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये विशेषतः दुधाळ गाई, म्हशींमध्ये २५ ग्रॅम ते ५० ग्रॅम क्षार मिश्रण द्यावे. पशू आहारात लुसर्न किंवा डाळ वर्गीय चाऱ्याचा समावेश असावा. गाय, म्हैस जर गाभण असेल तर शेवटच्या १ ते २ आठवड्यात कमी कॅल्शियमयुक्त आहार द्यावा. जनावराचा नियमित व्यायाम होईल याची काळजी घ्यावी. पशू तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार जीवनसत्व "ड " चे इंजेक्शन गाय,म्हैस विण्याअगोदर एक आठवडा आधी द्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Government Schemes : लाभाच्या योजना की रास्त भाव

Agriculture Issue : ‘कृषी’ची दैना

Industrial Alcohol Laws : औद्योगिक अल्कोहोलसंदर्भात कायद्यांचा अधिकार राज्यांनाच

Hydroponics Technology : हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान प्रशिक्षणात ३२ शेतकऱ्यांचा सहभाग

Rabi Sowing : पुणे जिल्ह्यात रब्बी पेरण्यांना सुरुवात

SCROLL FOR NEXT