Heatwave agrowon
Video

Highest Temperature: चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद

राज्यात यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच तापमानाने ४५ अंशाचा टप्पा पार केला. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण तसेच दमट हवामानाचा अंदाज आहे.

Team Agrowon

विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर ब्रम्हपुरी येथेही ४५ अंश सेल्सिअस तापमान होते. विदर्भातील इतर भागातही ४३ ते ४४ अंशाच्या दरम्यान तापमान होते. अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी आजपासून पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्यात आजपासून तीन दिवस उष्णतेची लाट राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून ४ दिवस तर नागपूर जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस आणि वर्धा जिल्ह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी उष्णतेची लाट राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. मराठवाड्यातही तापमान जास्तच राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी आजपासून पुढील ४ दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस तर जालना जिल्ह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी उष्ण तसेच दमट हवामानाचा इशारा देण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात आज आणि शनिवारी पावसाचा अंदाज देण्यात आला. तर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी उष्ण आणि दमट हवामान राहील. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026: माॅन्सूनची आगेकूच सुरुच; माॅन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबर बेटे व्यापून वाटचाली कायम ठेवली

Farm Loan Repayment: यंदाच्या वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा : मंत्री हसन मुश्रीफ

Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव

Interview with Raju Shetti: ‘कोकणच्या पुढाऱ्यांनी प्रश्‍नांचं गांभीर्य समजून घ्यावं’

Khandesh Irrigation Projects: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण

SCROLL FOR NEXT