raisin price agrowon
Video

Bajra Price: बाजरीचे भाव स्थिर; तसेच काय आहेत बेदाणा, हरभरा, लसूण आणि हिरव्या मिरचीचे आजचे बाजारभाव

Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण बेदाणा, हरभरा, लसूण, हिरवी मिरची आणि बाजरी बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

Bajra price today: रब्बी बाजरी बाजारात आल्यानंतर दरावरही दबाव दिसून आला. बाजरीला सध्या उठावही चांगला दिसत आहे. बाजरीला सरासरी २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहे. बाजारात लसणाची आवक चांगली सुरु आहे. सध्या लसणाला प्रतिक्विंटल ६ हजार ते ७ हजार रुपये भाव मिळत आहे. राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे. त्यामुळे हिरवी मिरची ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयाने विकली जात आहे. देशातील बाजारात हरभरा दर दबावातच आहेत. हरभऱ्याला मागील काही आठवड्यांपासून उठाव चांगला आहे. हरभऱ्याला देशातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यंदा बेदाण्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे बेदाण्याला चांगला दर आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात बेदण्याला प्रति किलोस गुणवत्तेप्रमाणे ७० ते २२५ रुपयांपर्यंत असा दर होता. एप्रिलपासून बेदाण्याला मागणीही वाढली. त्यामुळे बेदाण्याच्या दरात वाढ झाली. सध्या बेदाणा प्रतिकिलो १२० ते २८० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Subsidy Scheme: शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार दर्जेदार बियाणे

Gopinath Munde Scheme: योजना ऑनलाइन असूनही अनुदान ऑफलाइनच

Kharif Awareness Campaign: खरीपपूर्व जनजागृती मोहिमेत आधुनिक तंत्रज्ञानावर भर

Illegal HTBT Cotton Seeds: अवैध एचटीबीटी कपाशीचे ५६ लाखांचे बियाणे जप्त

Health Cards Scheme: दररोज दहा हजार कार्ड काढण्याचे नियोजन करा

SCROLL FOR NEXT