BT Cotton Production Agrowon
Video

BT Cotton Production: कपाशी लागवडीची नविन पद्धत फायदेशीर

Kharif Season 2024: बीटी कपाशीची लागवड करताना शेतकरी दोन ओळींतील अंतर जास्त म्हणजे साधारणपणे साडेतीन ते चार फूट आणि दोन झाडांतील अंतर कमी म्हणजे साधारण एक ते दीड फूट ठेवतात.

Team Agrowon

BT Cotton Crop: कपाशी लागवडीची दुसरी पद्धत आहे जोडओळ पद्धत.बीटी कपाशीची जोडओळ पद्धतीने लागवड करताना प्रत्येक तिसरी ओळ खाली ठेवावी. जोडओळीचा अवलंब करताना जमिनीचा प्रकार, वाण व त्याच्या वाढीचा प्रकार, सिंचन पद्धत अशा बाबी लक्षात घेऊन दोन ओळीतील अंतर कमी करावे. तसे काकरीने उभे काकर पाडावेत. समजा प्रचलीत पद्धतीने आपण ४ फूट बाय दीड फूट अशी लागवड करत असल्यास, याठिकाणी आपल्याला दोन ओळींतील अंतर कमी करताना साधारणत: तीन फूट राखावे लागेल. म्हणजेच उभे काकर आपल्याला तीन फुटी काकरीने व आडवे काकर सोयाबीनच्या सव्वा ते दीड फुटी काकरीने पाडावे लागते. शेतात तीन फूट बाय सव्वा ते दीड फूट याप्रमाणे आयताकृती चौफुल्या तयार होतील. यानंतर बीटी कपाशीची टोकण करताना दोन ओळी डोबल्यानंतर प्रत्येक तिसरी ओळ न डोबता खाली ठेवावी. म्हणजेच शेतात जोडओळीत लागवड होईल. म्हणजेच दोन ओळीतील अंतर ३ फूट, दोन जोड ओळीतील अंतर ६ फूट, दोन ओळींतील अंतर ३ फूट याप्रमाणे शेतात लागवड होईल. जोडओळ पद्धतीसाठी दोन ओळींतील अंतर कमी करताना झाडांची संख्या सरासरीच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT