नारळाच्या झावळ्यांपासून खतनिर्मिती  
प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची

नारळाच्या झावळ्यांपासून खत निर्मिती

प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी

नारळ झाडास महिन्याला एक नवीन पान (झावळी) येत असते, तर सर्वसाधारणपणे एक तयार झावळी मिळत असते. साधारणतः त्याचबरोबर बागेतील इतर गवतही उपलब्ध होत असते. या उपलब्ध झावळ्या व कचरा याचा वापर करून गांडूळखत तयार करावे. गांडूळखत निर्मितीसाठी सिमेंट टाकीचा वापर करावा. यामध्ये १ः१ या प्रमाणात शेण आणि कुजलेला पाचोळा यांचे थर द्यावेत. त्यावर पाणी शिंपडून ते ओले करावेत आणि त्यामध्ये ५० गांडुळे १० किलो मिश्रण या प्रमाणात सोडावीत. सदर युनिटसाठी सावलीची व्यवस्था करावी. ओलावा टिकून राहण्यासाठी त्यावर आवश्‍यकतेनुसार वारंवार पाणी शिंपडावे. एक ते दोन महिन्यांत यांची वाढ होते. सदर गांडुळे मोठ्या प्रमाणात खत करण्यासाठी वापरावीत. गांडूळखत हे खड्डा पद्धत व ढीग पद्धत या दोन्ही पद्धतींनी करता येते. उपलब्ध घटकांनुसार सिमेंट टाकी बांधावी. टाकीत गांडूळखत तयार होण्यास दोन ते तीन महिने लागतात. या कालावधीत वाफे ओले राहण्यासाठी त्यावर आवश्‍यकतेनुसार पाणी शिंपडावे. ज्या ठिकाणी गांडूळ खत तयार केले जाणार आहे, तो भाग सूर्यकिरणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मंडप अगर छप्पर करावे. गांडूळ खत निर्मिती टाकीत गांडुळे सोडावीत. वापरण्यात आलेल्या झावळ्यांनुसार ७० टक्के गांडूळखत ६० ते ७५ दिवसांत तयार होते. त्या वेळी पाणी शिंपडणे थांबवावे, जेणेकरून गांडुळे खालच्या थरात निघून जातील. दोन आठवड्यांनंतर गांडूळविरहित वरच्या थरातील गांडूळखत जमा करावे. ते चाळून घेऊन सावलीत वाळवावे. तसेच खालच्या थरात जमा झालेली गांडुळे पुढील गांडूळखत तयार करण्यासाठी वापरावीत. नारळ झावळीपासून तयार झालेल्या गांडूळखतात १.२ ते १.८ टक्के नत्र, ०.१ ते०.२ टक्का स्फुरद आणि ०.२ ते ०.४ टक्का पालाश अन्नद्रव्ये उपलब्ध असतात. याचे आकारमान इतर सेंद्रिय खतांपेक्षा कमी असल्याने वाहतूक व वापरण्यासाठी सोपे जाते. संपर्क : ०२३५२- २३५०७७ , प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers Support: कांद्याच्या भावात घसरण, उपाययोजनांसाठी सरकारकडून समिती गठित

Crop Damage Nashik: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

Fertilizer Overprising: सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Assembly Elections 2026: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी ९१.४६ टक्के, तामिळनाडूत ८४.४१ टक्के मतदान

Crop Insurance Hingoli: हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचा ९८ कोटी ७० लाख रुपये पिकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT