Government Support: ‘‘कर्जमाफी योजनेतील काही अटींबाबत अडचणी आहेत. अटींचा फेरविचार करण्याविषयी मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन,’’ असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाला दिले. कृषिमंत्री व शेतकरी शिष्टमंडळाशी शुक्रवारी (ता.१२) सकाळी पुण्यात झालेल्या चर्चेची माहिती किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. .या वेळी किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उद्धव पौळ, माणिक अवघडे, अजय करांडे, अमोल वाघमारे, गणेश दराडे उपस्थित होते. नवले म्हणाले, की कर्जमाफी योजनेतील जाचक अटींबाबत शेतकऱ्यांमधील असंतोष कृषिमंत्र्यांनी मान्य केला. ते या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत..Farm Loan Waiver: चाळीस लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस .तसेच, नियमित कर्ज भरणारे शेतकरी, सहकारी संस्था व एसटी महामंडळातील कर्मचारी खातेदारांना कर्जमाफीतून वगळले आहे. त्यांना लाभ मिळण्यासाठी सरकार पुनर्विचार करेल, असे आश्वासन भरणे यांनी दिले. यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांबाबत प्रयत्न करण्याचेही आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले..‘मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा’अजित नवले म्हणाले, ‘‘५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत असल्याचा सरकारचा दावा चुकीचा आहे. २०१९ मधील कर्जमाफीप्राप्त शेतकऱ्यांना यंदाची कर्जमाफी पूर्णतः मिळणार नाही. त्यांना केवळ ५० हजार रुपये मिळतील. त्यासाठी त्यांना जास्तीचे कर्ज फेडावे लागेल. अशा शेतकऱ्यांची संख्या १२.७१ लाख आहे..Farm Loan Waiver: पुणे जिल्ह्यात ३.१५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ.नियमित कर्जदार २३ .६३ लाख असून त्यांनी चार वेळा नियमित कर्ज भरलेले असेल तरच त्यांना सवलत मिळेल. यामुळे एकूण ३६.३४ लाख म्हणजेच ६५ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण लाभ मिळणार नाही. तसेच, ओटीएसमध्ये टाकलेल्या शेतकऱ्यांची संख्या २.९० लाख आहे. त्यांच्या माध्यमातून बॅंकांना फायदा मिळेल. मुळात, कर्जमाफीच्या आश्वासनावर देवेंद्र फडणवीस यांनी मते मागितली. .मात्र सत्तेवर येताच ते आश्वासन विसरले. शेतकरी आंदोलनानंतर ते कर्जमाफीस तयार झाले. परंतु, सातबारा कोरा करण्याचे मूळ आश्वासन फडणवीसांनी पाळलेले नाही. मुख्यमंत्री दावा करीत आहेत की, ९९ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ होतोय व जुजबी अटींचा तोटा नाही. मात्र, हा दावा धादांत खोटा आहे. मुख्यमंत्र्यांनी खुली चर्चा करावी. मात्र ते आंचारसंहितेच्या मागे लपत आहेत.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.