टेक्नोवन

Agriculture Technology : आयओटी ही काय भानगड आहे?

आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्ज. मराठीत त्याला वस्तुजाल असंही म्हणतात. हे एक उदयोन्मुख तंत्रज्ञान आहे. आगामी काळात या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्याची चिन्हे आहेत.

टीम ॲग्रोवन

गौरव सोमवंशी

आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्ज (Internet Of Things). मराठीत त्याला वस्तुजाल असंही म्हणतात. हे एक उदयोन्मुख तंत्रज्ञान (Latest Agriculture Technology) आहे. आगामी काळात या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्याची चिन्हे आहेत. (IOT Technology Use In Agriculture)

इंटरनेटचा वापर अगोदर फक्त वैज्ञानिकांपुरता मर्यादित होता. नव्वदीच्या दशकात हा वापर 'ईमेल' पासून सुरु होऊन साध्यासोप्या वेबसाईटपर्यंत (संकेतस्थळ) येऊन पोचला. त्यानंतर हळूहळू इंटरनेटचा वापर हा दैनंदिन कामाकरिता होत गेला, आणि आजकाल तर स्वस्त आणि सोप्या स्वरूपात इंटरनेटचा वापर कोणीही करू शकतो.

मग याचा पुढील टप्पा काय असेल? समजा की तुमच्याकडे एक प्रिंटर आहे आणि त्याची शाई संपत आली आहे. तुम्ही हे बघता, आणि लगेच इंटरनेटवरून शाई मागवता जी तुम्हाला काही वेळात घरपोच मिळेल. पण यापुढे जाऊन, जर का आपण तुमच्या प्रिंटरलाच एक 'सेन्सर' जोडून त्याला इंटरनेटशी जोडले तर? आणि प्रिंटरला फक्त इतकी जाणण्याची 'बुद्धी' दिली की शाई जर का संपत आली आहे, तर तूच स्वतः मालकाची वाट न पाहता स्वतःहून शाई मागवून घे. आणि मालकाला फक्त इतकं कळव की अमुक-तमुक व्यवहार हा आपोआप झाला आहे. आपण जेव्हा असं वस्तुंना आणि सेन्सॉरला इंटरनेटशी जोडतो, तेव्हा किती शक्यतांचा जन्म होतो याचा विचार करा. याच तंत्रज्ञानाला 'इंटरनेट ऑफ थिंग्ज' (आय.ओ.टी किंवा 'वस्तुजाल) असं म्हणतात.

अशा प्रकारे कोणत्याही वस्तूला आपण स्वतंत्रपणे इंटरनेटला जोडून किंवा वेगळे सेन्सर जोडून त्याठिकाणची कोणतीही माहिती थेट बघू शकतो. जर का आपण तापमान मोजणारे 'आय.ओ.टी.' यंत्र हे कोल्ड-कंटेनरमध्ये बसवले, तर आपल्याला एका जागी बसून सगळं बघता येईल की पूर्णवेळ सूचित केलेलं तापमान खरोखरच राखलं जात आहे की नाही. अशा प्रकारची यंत्रे ही ज्ञानेंद्रियांप्रमाणे काम करतात, म्हणजे त्या ठिकाणाची विशिष्ट माहिती इंटरनेटद्वारे कुठेही पोचवायचं काम.

अशा प्रकारची विविध यंत्र वापरून घरं ‘स्मार्ट’ बनवण्याचे प्रकल्पसुद्धा सुरू झाले आहेत. म्हणजे की घरात जर का फ्रिजमध्ये दूध संपत आले असेल, तर हे त्यामध्ये स्थित असलेल्या आय.ओ.टी यंत्राला लगेच कळेल आणि आपण पूर्वनियोजित केलेल्या नियमांना अनुसरून तो फ्रिज स्वतः जवळच्या दुकानदारास दूध घरी पाठवण्याची सूचना देईल. अशा आय.ओ.टी यंत्रांची इतक्या झपाटय़ाने वाढ होत आहे की दर सेकंदाला १२७ वस्तुजाल यंत्रे इंटरनेटशी जोडली जात आहेत. २०३० पर्यंत अशी सव्वा लाख कोटी यंत्रे जगभर इंटरनेटशी जोडली जातील असं अभ्यासकांचं भाकीत आहे.

gaurav@emertech.io

(लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे अभ्यासक असून उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT