Solar Energy Agrowon
टेक्नोवन

Solar Energy : सौर चूल,गॅसिफायर तंत्रज्ञानाचा वापर

देशामध्ये निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा बराच मोठा वाटा रोजचे अन्न शिजविण्यासाठी वापरण्यात येतो. जीवाश्म इंधनाचा पुरवठा वेगाने कमी होत असून, त्याच्या किमती वाढत आहेत.

टीम ॲग्रोवन

डॉ. ए. जी. मोहोड

सौर पेटी चूल

देशामध्ये निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा बराच मोठा वाटा रोजचे अन्न शिजविण्यासाठी वापरण्यात येतो. जीवाश्म इंधनाचा पुरवठा (Fossil fuel supply) वेगाने कमी होत असून, त्याच्या किमती वाढत आहेत. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वोत्तम उपलब्ध पर्याय म्हणजे सौरऊर्जेचा (Solar Energy) स्वयंपाकाकरिता वापर.

सौर चूल ग्रामीण स्त्रीला वरदान आहे. चपाती व रोटी वगळून रोजच्या जेवणातील सर्व पदार्थ, तळण्याचे पदार्थ वगळून सर्व (नाष्टयाचे) न्याहारीचे पदार्थ तसेच काही मिष्टान्न सौर चुलीद्वारे शिजवता येतात.

ऋतू हवामान, वेळ, अन्नाचा प्रकार पदार्थाची जाडी यावर अन्न शिजण्याचा कालावधी अवलंबून असतो.

मांसाहारी पदार्थांना तीन ते चार तासापर्यंत तर भाज्यांना अर्धा तास ते अडीच तास, डाळींना दीड ते दोन तास, भातास अर्धा तास ते दोन तास, चिकनसाठी दोन ते तीन तास असा साधारण शिजण्याचा कालावधी लागतो.

सौर पवन ऊर्जा सौर संयंत्र

पवन ऊर्जा ही गतीज ऊर्जा आहे. या ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करून ही साठविण्याकरिता विद्युत घटांचा वापर करण्यात येतो. याकरिता दोन प्रकारची जनित्रे वापरण्यात येतात.

पवन ऊर्जेचा वापर करून विद्युत उपकरणे चालविणे या करिता लघू पवन विद्युत जनित्र. याची क्षमता ५० वॅट ते २५ किलो वॅट पर्यंत असते.

पवन ऊर्जेबरोबर सौर ऊर्जेचा वापर करून विद्युत घट प्रभारित करण्यात येतो. यास पवन सौर संकरित जनित्र असे म्हणतात. ही जनित्र ३० किलो वॅट पर्यंत उपलब्ध आहेत.

या जनित्रांचा उपयोग करून विद्युतघट प्रभारित करणे, घरातील विद्युत उपकरणे चालविणे, अतिदुर्गम व ग्रामीण भागातील विद्युतीकरण, रेल्वे सिग्नल, दूरसंचार, लघुशक्ती ट्रान्समिटर्स योजना, पर्यटन स्थळावरील विद्युत सुविधा इत्यादी करिता करण्यात येतो.

यामध्ये सौर व पवन या दोन्ही प्रकारच्या ऊर्जेचा वापर होत असल्यामुळे विद्युत पुरवठ्यात खंड पडत नाही. ढगाळ वातावरण किंवा वाऱ्याचा मंद वेग यामुळे खंडीत होणारा विद्युत पुरवठा टाळता येतो. दोन्ही प्रकारच्या ऊर्जेच्या समन्वयाने अतिदुर्गम भागात अविरत व भरवशाचा विद्युत पुरवठा करण्यासाठी हे संयंत्र वरदान आहे.

पवन ऊर्जा

सुर्यकिरणांच्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या भागातील हवा गरम होते, त्यामुळे त्या भागात हवेचा दाब कमी होतो. जास्त हवेच्या दाबाकडील हवा या कमी हवेच्या दाबाकडे वाहू लागते, तेव्हा त्या हवेला ठराविक गती प्राप्त होते. या हवेच्या गतीला आपण वारा म्हणतो.

वाऱ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शक्ती सामावलेली असते, ज्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करता येऊ शकतो.

इतर ऊर्जा साधनापेक्षा पवन ऊर्जा ही निर्भेळ व किफायतशीर ठरते, कारण त्यासाठी आपणास कोणतीही आर्थिक गुंतवणुक करावी लागत नाही.

ऊर्जेचे प्रमुख स्रोत

प्राथमिक स्रोत : या स्रोतापासून निव्वळ ऊर्जा उपलब्ध होते. उदा. युरेनियम. याप्रकारे ऊर्जा स्रोत मर्यादित आहेत. कोळसा, नैसर्गिक वायू, आण्विक ऊर्जा हे स्रोत या प्रकारात मोडतात.

दुय्यम ऊर्जा स्रोत : या स्रोतापासून निव्वळ ऊर्जा मिळत नाही. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा व जल ऊर्जा इत्यादी. या प्रकारामध्ये कृषी क्षेत्राचा समावेश होतो. या क्षेत्रामध्ये मिळणारे उत्पन्न ऊर्जेच्या स्वरूपात रुपांतरीत करता येते.

पुरवणी ऊर्जा : या प्रकारामध्ये निव्वळ ऊर्जेचे उत्पादन होत नाही. उष्णतारोधक पदार्थ किंवा इतर ऊर्जा संधारण करणारे उपाय या सदरामध्ये मोडतात.

गॅसिफायर

गॅसिफायर हे एक असे संयंत्र आहे, ज्यामध्ये मर्यादित हवेच्या सान्निध्यात लाकडांना जाळून त्यामधून प्रोड्यूसर गॅसची निर्मिती केली जाते. या पद्धतीला गॅसिफिकेशन पद्धत म्हणतात.

गॅसिफायरमध्ये लाकूड, कोळसा, भात, तूस, नारळाचे कवच व इतर कृषी अवशेषांचा उपयोग गॅस निर्मितीसाठी करू शकतो.

गॅसिफायर पद्धतीत मर्यादित हवेच्या झोतात जास्त तापमानावर कृषी अवशेषांचे विघटन करून गॅस तयार होतो. हा गॅस ज्वलनशील असल्यामुळे आपण याचा उपयोग स्वयंपाक, पाणी गरम करण्यासाठी तसेच मोठ्या उद्योग धंद्यामध्ये सुद्धा केला जातो.

या गॅसची ज्वलन क्षमता १२०० किलो ज्यूल प्रति घन मीटर आहे. या गॅसचा उपयोग आपण इंजिन चालविण्यासाठी करू शकतो.

डॉ.अतुल मोहोड , ९४२२५४६९०५

(विभागप्रमुख,अपारंपरिक ऊर्जा विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT