Tractor Agrowon
टेक्नोवन

Tractor: देशातील ट्रॅक्टर विक्रीमध्ये वाढ

देशातील ट्रॅक्टर (Tractor) उत्पादन आणि निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. ट्रॅक्टर आणि मेकॅनायझेशन असोसिएशनने (Tractor And Machination Association) दिलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये मे महिन्यात ८१,९४० ट्रॅक्टरची विक्री झाली.

Team Agrowon

देशातील ट्रॅक्टर (Tractor) उत्पादन आणि निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. ट्रॅक्टर आणि मेकॅनायझेशन असोसिएशनने (Tractor And Machination Association) दिलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये मे महिन्यात ८१,९४० ट्रॅक्टरची विक्री झाली. तर जून महिन्यात ९४,४७७ ट्रॅक्टर विक्री झाली. म्हणजे ट्रॅक्टर विक्रीमध्ये मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली.

शेतमालाला चांगला दर मिळाल्याने ट्रॅक्टरच्या मागणीत वाढ झाली, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली. कोरोनाच्या महामारीमुळे ट्रॅक्टर उत्पादनामध्ये मोठी घट झाली होती. मात्र आता स्थिती सुधारत आहे.

यंदाच्या जून महिन्यात उत्पादनात वाढ झालीय. तसेच ट्रॅक्टर निर्यातीनेही उच्चांक गाठला आहे. ट्रॅक्टर उत्पादनाने आठ महिन्यांनंतर एक लाखाचा टप्पा ओलांडलाय. तसेच विक्रीमध्ये प्रत्येक महिन्यात वाढ होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.

जून महिन्यात भारतातील ट्रॅक्टर निर्यातीने १२,८४९ चा विक्रमी उच्चांक गाठला. मागील वर्षी याच कालावधीत निर्यात १२,६९० वर होती. तसेच सलग १३ व्या महिन्यात भारतीय ट्रॅक्टरच्या निर्यातीत दहा हजाराहून अधिक वाढ झाली आहे.

दरम्यान, हवामानशास्त्र विभागाने सलग चौथ्या वर्षी सरासरीइतका पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे ट्रॅक्टर उद्योगावर त्याचा चांगला परिणाम होईल, असा जाणकारांचा कयास आहे.

यंदा मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये ट्रॅक्टरची विक्री वाढली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र विक्री अजून कमीच आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये देशांतर्गत बााजारात १,१०,३९९ ट्रॅक्टर्सची विक्री झाली होती. यंदा मात्र जून महिन्यात ९४,४७७ ट्रॅक्टर्सची विक्री झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Company Fraud: शेतकरी कंपन्यांची सव्वा कोटीची फसवणूक

Sugarcane Crushing Licence: ऊस गाळप परवान्यासाठी १२७ कारखान्यांचे अर्ज

Soybean Crop Crisis: जुन्नरच्या पूर्व भागात सोयाबीनची वाढ खुंटली

Seed Company Licence Cancelled: ‘एसकेबी सीड्स’ कंपनीचा बियाणे विक्री परवाना रद्द

Agricultural Technology: शेतकऱ्यांना उद्यापासून पाहता येणार कृषी तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT